Akola News: पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे निघालेल्या एसटी बसमधील चालक आणि वाहकाने चक्क दारूच्या नशेत बस चालवल्याची गंभीर घटना घडलीय. या प्रकारामुळ 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी संताप व्यक्त करत रोष व्यक्त केला. दरम्यान, यातील संतप्त प्रवाशांच्या तक्रारीनंतर बीड पोलीस आणि एसटी प्रशासनाने दोघांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे.

37 प्रवाशांचा जीव धोक्यात, परिवहन विभागाच्या कारवाईकडे लक्ष

पुढे आलेल्या माहितीनुसार, अकोट आगाराची एमएच-14-6140 क्रमांकाची ही बस असून ही बस पंढरपूरहून अकोटकडे प्रवास करत होती. यातील चालक संतोष रहाटे आणि वाहक संतोष झालटे हे बस चालवत होते. दरम्यान हे दोघे दारू पिऊन असल्याचे निदर्शनात आले. यावेळी बसमध्ये 37 प्रवाशी प्रवास करत असून या साऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. अशातच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र एकीकडे राज्यात होणारे अपघात आणि त्यात नाहक बळी पडणाऱ्या घटना लक्ष्यात घेता बस चालकाचा असा बेजवाबदारपणा समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. परिणामी राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित विभाग या प्रकरणी नेमकी काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

केडीएमटीच्या एसी बसेस बंद! प्रवाशांचा “गारेगार” प्रवास थांबला 

वातानुकुलीत गारेगार प्रवासाचे गाजर दाखवणाऱ्या केडीएमटी कडून  प्रत्यक्षात प्रवाशाच्या पदरात उपेक्षित प्रवासच पाडण्यात आलाय . डोंबिवली आणि कल्याणमध्ये धावणाऱ्या केडीएमटीच्या अत्याधुनिक एसी बसेस ‘नो विमा, नो पासिंग’ या कारणांनी अचानक गायब झाल्या असून प्रवाशांना पुन्हा एकदा रिक्षा चालकांच्या लुटमारीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे नवी मुंबई, ठाणे परिवहनच्या एसी बसेस नियमित कल्याण डोंबिवलीत सेवा देत असताना केडीएमटीला मात्र आपल्या सेवा सुधारण्याबाबत उदासीन असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशनअंतर्गत तब्बल ९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून २०७ इलेक्ट्रिक एसी बसेस खरेदीचा डंका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पिटण्यात आला होता. कल्याण डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन उपक्रमातून 207 इलेक्ट्रिक एसी बसेस खरेदी करण्यासाठी 99 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून केडीएमटीने मे कॉसीस मोबलिटी सर्व्हिसेस आणि बुथेलो प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंत्राटदाराची नियुक्ती करत त्यांच्या माध्यमातून मोठ्या मिडी आणि मिनी अशा 207 बसेसची खरेदी करून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जर्मनी बनावटीच्या अत्याधुनिक युरो बसेस शहरात प्रवाशांना गारेगार सेवा देणार असल्याचे स्वप्न यावेळी परिवहन विभागाकडून दाखविण्यात आले होते.

मात्र प्रत्यक्षात या कंपनीची बसेस निर्मितीची क्षमताच नसल्याने पहिल्या 10 बसेस बनवतानाच कंपनीला घाम फुटला पुढील बसेस तयार करण्यास असमर्थता दाखवत कंपनीने कशाबशा 8 बसेस अडीच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुरवल्या. कोसिस मोबिलिटी आणि बुथेलो प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांकडे एसी बसचा ठेका दिला, पण त्यांची तितकी निर्मिती क्षमत नसल्याने केडीएमटी प्रशासन पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहे . जर्मनी बनावटीच्या युरो टेक्नॉलॉजी बस कल्याण-डोंबिवलीत दाखल होणार, प्रवाशांना गारेगार सेवा मिळणार असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते  . पण प्रत्यक्षात प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली . केडीएमटीच्या ताफ्यातकेवळ 8 बस अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दाखल झाल्या. त्यापैकी 4 बस काही महिन्यांतच बंद पडल्या आणि उर्वरित 4 बस विमा नुतनीकरणाच्या फेऱ्यात अडकून शेवटी आगारात उभ्या आहेत.आता सुटे भाग मिळत नाही, विमा भरलेला नाही, बस थांबल्या आहेत अशी कारणे  सांगत जबाबदारी एकमेकांवर ढकलली जाते.

याबाबत केडीएमसीच्या परिवहन विभागाकडून मात्र “एसी बस कंत्राटदाराच्या माध्यमातून चालवल्या जात असून बस पासिंग, विमा, पीयूसी यासारख्या गोष्टीची पूर्तता त्यानेच करायची असून विमा पॉलिसी नूतनीकरण करून घेण्याबाबत त्याला कळविण्यात आले आहे. लवकरच नुतनीकरण करून या बसेस रस्त्यावर उतरतील” असे स्पष्ट केले. 

आणखी वाचा



Source link