Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसने (Congress) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar ) वारंवार अपमान केला. नेहरूंपासून आतापर्यंतच्या कांग्रेस नेतृत्वाने बाबासाहेबांचा वारंवार अपमान केलाय. त्यांचं योगदान काँग्रेसने नाकारलंय. काँग्रेसचे लोक बाबासाहेबांचा अपमान करतात, त्यांची संविधान निर्माता ही ओळख काँग्रेसला खुपते, कारण ते दलित मातेचे सुपूत्र होते.
मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझ्यासाठी सदा-सर्वदा पूजनीय आहेत आणि राहतील. आम्ही देशभरात त्यांची स्मारकं उभारली. मी अकोल्यातून काँग्रेसच्या शाही परिवाराला आव्हान देतो की त्यांनी बाबासाहेबांच्या पंचतिर्थाला वंदन केलं हे सिद्ध करावं. असे थेट आव्हान देत अकोल्याच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.
काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूर होईल- नरेंद्र मोदी
काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूर होईल. काँग्रेस दलित, आदिवासी आणि ओबीसींची प्रगती पाहू शकत नाही. कांग्रेस दलितांमधील जातीजातीत भांडणं लावत आहे आणि हिच चाल आणि चरित्र काँग्रेसचे आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.’एक है तो,सेफ है असे म्हणत हरियाणात काँग्रेसचे मनसुबे उधळून लावलेत. जम्मू काश्मीर विधानसभेत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव पुन्हा मंजूर केला.
मात्र तुम्हाला वाटतं का असं व्हावं? दहशतवादी संघटना, पाकिस्तानने हे कलम हटविण्याचा विरोध केला होता. काँग्रेस तिच भाषा बोलतेय. 370 लागू केलं तर काश्मीरमध्ये बाबासाहेबांचं संनिधान संपुष्टात येईल.दरम्यान, कोऱ्या पानांचं संविधान पुस्तक घेऊन फिरणारे लोक पापी आहेत, असे म्हणत मोदींनी राहूल गांधींना अप्रत्यक्षपणे टोला लागवला आहे.
सभेतील गर्दी विजयाचा विश्वास देणारी
370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमधल्या आदिवासी, दलितांना आरक्षण मिळालं होतं. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राला नवी दिशा द्यायची आहे. महायुतीच्या उमेदवारांना बहूमताने जिंकवा. काल दोन सभा आणि आजची सभेतील गर्दी ही विजयाचा विश्वास देणारी आहे. असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्याच्या सभेतून व्यक्त केला घरी.
नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ-रामदास आठवले
नरेंद्र मोदींना हटवू पाहणाऱ्याला आम्ही मिटवल्याशिवाय राहणार नाही. 370 कलम हटविण्याचा निर्णय क्रांतीकारी आहे. नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेसला काश्मिरमध्ये परत 370 कलम आणायचे आहे. या देशाचे संविधान कुणीच बदलवू शकत नाही. राहुल गांधी संविधानाचे पुस्तक दाखवत ते संविधान बदलायच्या गोष्टी करतात. मात्र नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ आहेत. असेही रामदास आठवले म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..