Nashik Crime News: नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बागलाण तालुक्यातील दरेगाव येथे एका आदिवासी शेतमजुराचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या सततच्या मारहाणीला कंटाळून पत्नीनेच त्याची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी जायखेडा पोलीसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.
जायखेडा पोलीसांच्या हद्दीत कैलास जिभाऊ पवार वय ४५ हे घराच्या पाठीमागील बाजूस मृत अवस्थेत मिळून आल्याने हत्या की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. घटनास्थळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. पंचनामा करून मयत कैलास जिभाऊ पवार याचा मृतदेह नामपूर ग्रामिण रुग्णालय पाठवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोद दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखुन जायखेडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गावात दाखल झाले.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृताची पत्नी मनीषा हिची कसून चौकशी करण्यात आली. कैलास सतत पत्नीच्या चारित्र्यावरुन संशय घेत असे. त्यावरुन तिला मारहाणदेखील करत होता. या त्रासाला कंटाळूनच तिने त्याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.
रहाटगाव येथे 55 वर्षांच्या व्यक्तीची हत्या
रहाटगाव परिसरातील एका 55 वर्षीय व्यक्तीची चाकून भोसकून हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 12 जुलै रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान घडली आहे.राजकुमार सुंदरराणी असे मृतकाचे नाव आहे. ओळखीच्या काही व्यक्तींनी राजकुमारचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान हत्येचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नांदगाव पेठ पोलिसांनी राजकुमार यांच्या भावाच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान दोन्ही आरोपी अजूनही पसार असून पुढील तपास पोलीस करत आहे.