Chhagan Bhujbal on Jay Pawar Video: जय पवारांनी VSR कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा एक व्हिडिओ समोर आणला आहे. यात रोहित सिंह मुख्य पायलटच्या सिटवर झोपलेले दिसतायत.
रोहित सिंह यांच्या निष्काळजीपणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर VSR च्या कारभारावर बोट ठेवण्यात आलंय. या प्रकरणात रोहित सिंह यांना अटक करण्याची मागणी जय पवार यांनी केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ अजित पवारांच्या विमानातील नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अजित पवारांच्या निधनानंतर VSR कंपनीवर रोहित पवारांनी गंभीर आरोप केले आहेत, आता रोहित पवारांच्या साथीला जय पवारही मैदानात उतरले आहेत, जय पवारांनी VSR कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा एक व्हिडिओ शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओत रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर झोपलले दिसतायत त्यामुळे पुन्हा एकदा VSR कंपनीचा कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. 

छगन भुजबळांचं व्हिडीओवर स्पष्टीकरण

अजित पवारांच्या विनानातील तो व्हिडीओ नाही. त्यात असता तर ठार झाला असता असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “पण ते चुकीचं आहे. पायलटच त्या सीटवर बसू शकतो. मालक झोपला असेल तर निष्काळजीपणा आणि मुजोरपणा आहे”. 

विमान झाडावर आदळल्याच्या दाव्यावर ते म्हणाले की, “मी गेलो होतो तिथं विमान झाडावर आदळले नाही. तिथे कुणीही असे म्हटले नाही”.

दुर्घटनेच्या सीसीटीव्हीवर त्यांनी म्हटलं की, “पहिल्यांदा लँड करताना तो वर गेला. दुसऱ्यांदा आला तेव्हा विमान कलले. – विमान त्याला सरळ करायला किंवा कंट्रोल करायला वेळ मिळाला नसेल. 10 हजार फुटांवर काहीतरी करायला वाव असतो. तो वेगाने लँड करत होता. DGCA जे सांगत आहे त्याची छानबिन होईल. 

जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा VSR कंपनीचा निष्काळजीपणा समोर आला आहे, कारण याआधीही रोहित पवार यांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमधून आणि DGCAनं देखील त्यांच्या अहवालातून VSR कंपनीच्या अनागोंदी कारभारावर बोट ठेवलं होतं, आणि आता चक्क या कंपनीच्या मालकाच्या निष्काळजीपणाचा व्हिडिओच समोर आला आहे, दरम्यान यानंतर रोहित पवारांनीही कडक शब्दात इशारा दिला आहे. 

…त्यांना मी सोडणार नाही-रोहित पवार 

हाच तो VSR कंपनीचा मालक रोहित सिंह. आज तो जणूकाय राज्यातील सगळ्याच मोठ्या नेत्यांपेक्षाही मोठा झाला आहे. याच्याच लग्नाला केंद्रातील मंत्री आणि राज्यातील सत्तेतील बडे नेते गेले होते. म्हणूनच त्याला वाचवण्याचा सगळीकडूनच प्रयत्न होताना दिसत आहे. विमान हवेत असताना स्वतः पायलट असूनही झोप काढतानाचा त्याचा माझे बंधू जय पवार यांनी शेअर केलेला हाच तो व्हिडिओ..! DGCA ची आजपर्यंतची संपूर्ण हालचाल बघता त्यांच्याकडून 
यावर कारवाई होईल की नाही. याबाबत आमच्या मनात शंका आहे. पण दादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना आम्ही कदापि सोडणार नाही असं रोहित पवार म्हणाले आहेत. 

जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओनंतर भाजप नेते नवनाथ बन यांनी कारवाईची मागणी केलीय, या प्रकरणात केंद्र सरकारनं लक्ष घालावं, तसंच दोषींवर कारवाई करावी असं मत त्यांनी मांडलं आहे, जय पवारांनी समोर आणलेल्या व्हिडिओत VSRकंपनीच्या मालकाचा निष्काळजीपणा दिसत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

एकीकडे VSRला AAIBनं दिलेली क्लीन चिट आणि आता जय पवारांनी समोर आणलेला व्हिडिओ यामुळे AAIBवरही रोहित पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसंच या व्हिडिओनंतर VSR त्यांची भूमिका विशद करणार का? किंवा रोहित सिंह यांच्यावर कोणती अॅक्शन घेतली जाणार?
याकडे देखील आता लक्ष लागलं आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp