Pune Crime News : पुणे पोलिस दलात खळबळजनक घडामोड घडली आहे.  पुण्यातील रिल स्टार पोलीस सोनाली हिंगे आणि तिच्या दोन साथीदार पोलिसांचं अखेर निलंबन झाले आहे.  कर्तव्यातील हलगर्जीपणा व बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी तिघातिघांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या तिघांनी नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून सात लाखांची खंडणी उकळली होती.  संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी होईपर्यंत निलंबन कायम राहणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पोलीस उपनिरीक्षक अजित  बडे, पोलीस शिपाई सुदाम  तायडे आणि दामिनी पथकातील रील स्टार म्हणून ओळखली जाणारी सोनाली  हिंगे  अशी निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत.   अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे, पोलिस उपनिरीक्षक बडे हे सद्या सायबर पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. तर हिंगे ही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दामिनी मार्शल म्हणून कार्यरत आहे. सोशल मीडियावर देखील रिलस्टार म्हणून प्रसिद्ध आहे. तर सुदाम तायडे हे देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेमणूक आहे.  पोलिसांच्या या खंडणीखोरीच्या  प्रकारामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने तसेच  गंभीर बाब म्हणजे महिलांच्या रक्षणासाठी निर्माण केलेल्या दामिनी पथकातील पोलिस यात असल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले. 

नेमकं प्रकरण काय आहे? 

महाविद्यालयातील अल्पवयीन तरुणीचे काही कागदपत्र महाविद्यालयात अडकले होते. त्यासाठी तिने पोलिसांची मदत घेतली. मात्र पोलिसांनी याचाच फायदा उचलला आणि थेट विद्यार्थीनीला सोबत घेऊन प्रचार्यांना जाब विचारला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर या महाविद्यालयाच्या तरुणीला हाती धरुन प्राचार्य आणि महाविद्यालयात आपला छळ होतोय अशी तक्रार द्यायला लावली. तक्रार दिल्याचं कळत्यावर हिंगे, अजित बडे आणि सुदाम तायदे यांनी प्राचार्यांना धमकवायला सुरुवात केली. 

हे देखील वाचा… पुण्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी रेंटल डील!  2,63,00,00,000 रुपये भाडं, मोठ्या इंटरनॅशनल कंपनीने पुण्यात पूर्ण इमारत भाड्याने घेतली

प्रकरण गंभीर आहे… अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. आता जर ही तक्रार दाखल झाली तर तुमच्या विरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल करु आणि महाविद्यालयाचं नाव खराब करु म्हणत थेट 10 लाखांची मागणी केली. भीतीपोटी प्राचार्यांनी 10 नाही तर सात लाख दिले. पण नंतर… या तिघांनी सात लाख वाटून घेतले होते. विद्याथीनी हे सगळं काय घडतंय हे बघत होती. त्यावेळी तिला काहीतरी चुकीचं करत असल्याचं जाणवलं. तिने थेट पोलिसांना येऊन खोटी तक्रार द्यायला सांगितला असा प्रकार बोलून दाखवल. पालकांना विश्वासात घेऊन तरुणीने सगळा धीर दाखवला. या पद्धतीने पोलिसांनी तक्रारीची तपासणी केली आणि त्यात असा प्रकार घडण्याचं समोर आलं. त्यानंतर पुन्हा या तीन पोलिसांवर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोण आहे सोनाली हिंगे?

सोनाली हिंगे ही कबड्डीपट्टू , रील स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे शहर पोलिसांच्या दामिनी पथकातील पोलीस मुलींच्या सुरक्षेसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ती विशेष चर्चेत आली. कॉमर्समधून पदवीचं शिक्षण घेतलेल्या सोनाली हिंगेनं स्पर्धा परिक्षेचाही अभ्यास केला. गेल्या 12 वर्षांपासून ती पुणे पोलिसांत कार्यरत आहे.  वाहतूक विभाग, कोंढवा पोलीस स्टेशन, शिवाजीनगर इथं तीनं कर्तव्य बजावल आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp