Yashomati Thakur : तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पराभवानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ज्या मतदारांनी मला आणि महाविकास आघाडीला मतदान केलं त्या सर्व मतदारांची मी आभार मानते असं त्या म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल आश्चर्यजनक आहेत, हे अपेक्षित नव्हते असे त्या म्हणाल्या. पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी खेळली, हे समजण्याच्या पलीकडे आहे. जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात झाल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
विरोधी पक्ष पूर्ण गिळून टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात आहे हे माझं मत असल्याचे ठाकूर म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर यशोमती ठाकूर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपने यशोमती ठाकूर यांच्याविरोधात राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. अटितटीच्या लढतीत अखेर राजेश वानखेडे विजयी झाले आहेत.
अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ
लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते. मात्र यंदा भाजपने योग्य नियोजन आणि रणनीती आखत घवघवीत यश मिळवले आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ झाल्याचे चित्र असून धक्कादायक निकाल आले आहे. यात अचलपूर मतदारसंघात प्रहारच्या बच्चू कडू यांच्यासह काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर अमरावती विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अजित पवार गटाच्या सुलभा खोडके, बडनेरा येथून युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा 37 हजार मतांनी चौथ्यांदा विजयी झाले आहे.
अधिक पाहा..