Akola News : अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात PSI अर्थातच पोलिस अधिकारी (Akola Police)आणि एका शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचा शाब्दिक वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पीएसआय (PSI) अर्थातच पोलीस अधिकारी दारूच्या नशेत शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करत निलंबनाच्या कारवाईची धमकी देत आहे, असा आरोप करीत या वैद्यकीय अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रार केलीय. तू आरोग्यसेवा देण्यात हजर का राहत नाही? या कारणांवरून या दोघांमध्ये हा शाब्दिक वाद झाल्याचे बोलल्या जातंय.

निलंबनाच्या कारवाईची धमकी, पीएसआयवर कठोर कारवाईची मागणी 

दरम्यान, अकोल्यातीलचं दहीहंडा आरोग्य प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सागर कळसकर आणि दहीहंडा पोलीस स्टेशनचे PSI प्रभुदास गंडलिंगे यांचा वादाचा हा video सर्वत्र वायरल होत आहे. गंडलिंगे या पीएसआयने शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची वाद घालत ‘तू आरोग्य केंद्रात हजर का राहत नाही?’, असा सवाल विचारत थेट डॉक्टराला शिवगाळ घातलीय. इतकंच नाही तर पुढं निलंबनाच्या कारवाईची धमकी दिलीय. असा आरोप या डॉक्टराने तक्रारीतून केलाय. या पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याची तक्रार वैद्यकीय अधिकाऱ्याने अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांकडे केलीय. शिवीगाळ करणाऱ्या पीएसआयवर कठोर कारवाईची मागणी आता या डॉक्टराकडून होत आहे. नेमकं आता संपूर्ण प्रकार नंतर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

बंदीवान कैद्याने गळफास घेण्याचा प्रयत्न फसला, अन्.. 

यवतमाळ कारागृहातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका बंदीवान कैद्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र चादर तुटल्याने ही प्रयत्न अपयशी ठरला आणि हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौचालयाच्या खिडकीला चादर बांधून गळफास घेण्याचा यात प्रयत्न करण्यात आला असून यवतमाळच्या जिल्हा कारागृहातील ही घटना आहे. गळफास घेतांना वजनामुळे चादर तुटली आणि बंदीवान शौचालयात कोसळला. या प्रकरणी पोक्सोच्या गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून शुभम जाधव असे कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या बंदीचे नाव आहे. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link