Balwant Wankhede अकोला : अमरावतीचे (Amravati) काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे (Balwant Wankhede) यांनी वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांच्यावर नाव न घेता टीका केलीये. महाविकास आघाडीचं मतविभाजन करू पाहणाऱ्या लोकांपासून जनतेने सावध राहण्याचं आवाहन खासदार बळवंत वानखेडे यांनी केलंय. ते अकोला येथे बोलत होते. आंबेडकरांच्या मतांचा फायदा थेट भाजपला होत असल्याचा आरोपही त्यांनी त्यांचं नाव न घेता केलाय. आंबेडकरांनी अमरावती मतदारसंघात उमेदवार उभा केला होता. मात्र, आपण आंबेडकरांच्या रक्ताचा आणि विचारांचा वारसदार असल्याचं खासदार बळवंत वानखेडे म्हणालेय.

प्रतापराव जाधव यांना सत्तेच्या शिवाय दुसरं काहीच सुचत नाही  

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील गोमाल गावातील तीन अतिसाराच्या(Diarrhea) रुग्णांचा  मृत्यू  झाला आहे. गोमाल हे गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वाहन जायला रस्ता नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य प्रशासनाला या रुग्णांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट असल्याचं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्वला पाटील यांनी एबीपी माझा शी बोलताना सांगितलंय. त्यामुळे गोमाल गावात अतिसाराची लागण असल्यावरही बुलढाणा आरोग्य प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती आहे.  याविषयी बोलताना खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर टीका केलीय. त्या लोकांना सत्तेच्या शिवाय दुसरं काहीच सुचत नसल्याचं खासदार वानखेडे म्हणालेय.

राहुल गांधींनी आपला स्वभाव बदलल्याने कार्यकर्त्यांना मोठी ताकद- बळवंत वानखडे

लवकरच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. हीच शक्यता लक्षात घेता राज्यभरातील पक्षांनी आतापासूनच या निवडणुकीची तयारी केली आहे. सभा, बैठका, रॅली यामार्फत लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न राज्यातील सर्वच पक्ष करत आहेत. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी राजकीय रणनीतीकारांची मदत घेतली जात आहे. भाजपासारखा राष्ट्रीय पक्ष केंद्रातील नेत्यांनाही महाराष्ट्रात प्रचारासाठी बोलवणार आहेत. असे असतानाच आता काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी मोठी योजना केली आहे. पक्षातर्फे काँग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. ते विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रभर जाहीर सभा घेणार असून त्यासाठी काँग्रेसने नियोजन चालू केले आहे. 

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचा मोठा फायदा काँग्रेसला होणार असल्याचेही काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे म्हणाले. राहुल गांधींनी आपला स्वभाव बदलल्याने कार्यकर्त्यांना मोठी ताकद मिळाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदावर काहीही बोलायला त्यांनी नकार दिलाय.

हे ही वाचा  

 

अधिक पाहा..



Source link