Amravati Airport Inauguration : अमरावतीकरांसाठी आजचा (16 एप्रिल 2025) दिवस आनंदायी आणि स्वप्नपूर्ती करणारा आल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्याला कारण ही अगदी तसेच आहे. गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अमरावती विमानतळाचे आज  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नुकतेच अमरावती विमानतळावर (Amravati Airport) आगमन झाले आहे. यावेळी 72 सीट आसनी पहिलं विमान अमरावती विमानतळावर दाखल झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्रीसह महायुतीतील अनेक प्रमुख नेते या उद्घाटन सोहळ्याला हजार राहणार आहे. या विमानात पहिला प्रवास करणाऱ्या अमरावतीकरांना मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या  विमानतळा उद्घाटन सोहळ्यासोबतच दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्रही सुरु होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. येत्या जुलै महिन्यापासून हे प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे. यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, नवनीत राणा यांच्यासह विरोधी पक्षातील नेते ही या कार्यक्रमाला उपस्थित असल्याची माहिती पुढे आहे. 

मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आपल्या मामाच्या घरी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मामाचं शहर म्हणजे अमरावती. लहानपणी देवेंद्र फडणवीस हे अमरावतीला नेहमी यायचे, त्यांचं अमरावती शहराशी वेगळं नातं आहे. कलोती कुटुंबात देवेंद्र फडणवीस यांचे मामा, मामी, मामे भाऊ यांच्यासह अनेक नातेवाईक आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अमरावती शहरात येत आहे. त्यामुळे आज ते विशेष करून ते आपल्या मामाच्या घरी जाणार आहे आणि त्याठिकाणी त्यांचं कलोती कुटुंबाकडून भव्यदिव्य स्वागत केलं जाणार असल्याची माहती पुढे आले आहे. 

अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रश्नाचं भिजत घोंगड

दरम्यान, अमरावती विमानतळ विस्तारीकरणानंतर अमरावती ते मुंबई विमान सेवेचा आजपासून प्रारंभ होतोय. मात्र, यावरून अकोल्यातील लोकप्रतिनिधींविरोधात जनतेत मोठा जनक्षोभ दिसतोय. उद्याच्या अमरावतीतील विमानसेवेच्या उद्घाटनाला अकोल्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने जाऊ नये,अशी मागणी अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते जावेद झकारिया यांनी केलीये. अकोल्यातील लोकप्रतिनिधींची कुणी दखलच घेत नसेल तर त्यांनी कार्यक्रमाला का जावं? असा सवाल त्यांनी केलाय. अकोल्यातील सर्व आमदार आणि खासदारांना पत्र लिहीत झकारियांनी आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केलीये.

 कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची मागणी

अकोल्याचं विमानतळ 1941 साली उभारण्यात आलंये. गेल्या अनेक वर्षांपासून अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रश्नाचं भिजत घोंगड पडलंय. अकोला विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 1800 मीटर वरून 2200 मीटर करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जमीनही अधिग्रहित करण्यात आलीये. मात्र, त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये. मात्र, अकोल्याच्या विमानतळानंतर 41 वर्षांनी उभारण्यात आलेल्या अमरावती विमानतळावरून आता मुंबई विमानसेवा सुरू होतीये. यामुळे अकोल्यातील लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं नागरिकांना वाटतंय.

अधिक पाहा..



Source link