Devendra Fadnavis : मंत्री आपल्या भाषणामध्ये कधीकधी गमतीने देखील बोलतात, प्रत्येक गोष्टीचा आपण बाऊ करु लागलो तर हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी दिली आहे. काही स्टेटमेंट महत्त्वाचे असतात तर काही चुकीची असतात, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि मंत्री मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली.  

शिरसाट जे बोलले त्यांचं चुकीचं वाटत नाही 

शिरसाट जे बोलले त्यांचं चुकीचं वाटत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. मेघना बोर्डीकर सोबत बोलणं झालं आहे. त्यांचं बोलणं माध्यमांकडून अर्धवट दाखवण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले. 

नेमकं काय म्हणाल्या होत्या मेघना बोर्डीकर?

राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला काणाखाली मारण्याची धमकी देतानाचा एक व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट केला होता. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर आता मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. रोहित पवार यांनी अर्धवट माहितीच्या आधारे राज्यातील जनतेची दिशाभूल करू नये. बोरी येथील विधवा,मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी हा ग्रामसेवक छळ करतो, त्यांच्याकडे पैशांची मागणी करतो, अशी तक्रार होती. त्याची वारंवार तक्रार करूनही तो ऐकत नव्हता. त्या कार्यक्रमात काही महिला माझ्याकडे आल्या. त्यामुळे मी एक पालक या नात्याने ग्रामसेवकाला ज्या भाषेत कळते त्याच भाषेत समज दिली. मी त्या रागातून संबंधित ग्रामसेवकाला बोलले, असे मेघना बोर्डीकर यांनी सांगितले. 

नेमकं काय म्हणाले होते मंत्री संजय शिरसाट?

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ हे अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाचे उद्घाटनासाठी शहरात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी केलेले एक विधान नवा वाद निर्माण करणारं ठरलं आहे. सामाजिक न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करु. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाट यांनी केलं आहे. यावेळी व्यासपीठावर भाजप आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते. 

महत्वाच्या बातम्या:

Video : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? मंत्री संजय शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

आणखी वाचा



Source link