Bacchu Kadu : कर्जमाफीसह विविध शेती प्रश्नांच्या मुद्यावरुन प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे अन्नत्याग उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, आज बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत ऑनलाईन बैठक होणार आहे. पण ऑनलाईन बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख केव्हा देणार? हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत ऑनलाईन बैठक होणार आहे. या बैठकीत कर्जमाफीची तारीख केव्हा देणार हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ असे बच्चू कडू म्हणाले. आंदोलन करत असताना कार्यकर्त्यांनी स्वतःला इजा होऊ देऊ नये असे आवाहन कडू यांनी केले. बच्चू कडू यांची प्रकृती पूर्णपणे खालावली आहे. बच्चू कडू यांना उठून बसण्यासाठी त्रास होत आहे. सकाळी बच्चू कडू यांच्या उलट्या देखील झाल्या आहेत. गेल्या पाच दिवसापासून जेवण न केल्याने बच्चू कडू यांचे वजन चार किलोपेक्षा जास्त घटलं आहे.
परभणीत प्रहारच्या पदाधिकाऱ्यांकडून मुंडण आंदोलन
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी सह इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल न घेण्यात आल्याने आता राज्यातील इतर ठिकाणी पदाधिकारी आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. परभणी मधील प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन केले आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुंडन करून सरकारचा निषेध केलाय. निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीच आश्वासन देऊन त्यांनी त्याची पूर्तता न केल्याने बच्चू कडू हे आंदोलन करत आहेत. जर सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन कर्जमाफी जाहीर केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
नेमक्या काय आहेत मागण्या?
1. दिव्यांग व विधवा महिलांना रु 6000/- मानधन देण्यात यावे.
2. आपल्या संकल्पानूसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी शेतमालाला MSP (हमीभाव) वर 20 टक्के अनुदान देण्यात यावे.
3. दि.07 एप्रिल 2025 रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या ईतिवृत्तप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे.
4. युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्यांच्या जाहिराती प्रसिध्द करण्यात याव्या.
5. शहराप्रमाणे ग्रामिण भागातील घरकुलांकरीता समान निकष लावून किमान रू 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे.
6. शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजूरांच्या अपघाती मृत्यु झाल्यास आर्थीक सहाय्य देण्यात यावे तसेच शेतमजूरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे.
7. पेरणी ते कापणी पर्यंत मजूरीची सर्व कामे MSP मध्ये घेण्यात यावे तसेच फळपिकांना 3:5 रेषो लावून दुग्ध व्यवसायसूध्दा MSP ला जोडण्यात यावा. हे जर होत नसेल तर तेलंगाणाच्या धर्तीवर एकरी 10,000/- मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा.
8. ज्याप्रमाणे रासायनिक खाताला अनुदान देण्यात येते त्याच प्रमाणे शेणखताला / सेंद्रीयखताला अनुदान देण्यात यावे.
9. मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे.
10. मनरेगा मधील मजूरी रू 312/- वरून रु.500/- करण्यात यावी.
11. निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे.
12. दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसेच गायींच्या दुधासाठी बेस रेट रु.50/- प्रती लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट रू 60/- प्रती लिटर मिळावा. i
13. कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान 40/- रूपये बाजार भाव होई पर्यत निर्यात बंदीचा निर्णय करू नये.
14. सन 2025-26 या वर्षासाठी ऊस पिकाला प्रति टन 4300/- रूपये दर 1 टक्के रिकव्हरी बेस रेट धरुन मिळावा. तसेच पुढील 11 टक्के सिकव्हरीसाठी 430/- रूपये एफआरपी दर मिळ वेत. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी व 15 दिवसामध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावेत.
महत्वाच्या बातम्या:
बच्चू कडूंच्या आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रभर पडली पाहिजे, निलेश लंकेंचा हल्लाबोल, रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन
आणखी वाचा