Amol Mitkari : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ते बिग बॉसच्या (Bigg Boss) नव्या ‘सीझन’ची. बिग बॉसच्या नव्या घरात कोण असेल?, यावरून आता तर्क वितर्कांना उधाण आलंय. यातच या संदर्भात ‘बिग बॉस’चे होस्ट असलेल्या महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोये. राजकीय नेत्यांमध्ये अमोल मिटकरींना (Amol Mitkari) ‘बिग बॉस’च्या नव्या घरात पाहायला आपल्याला आवडेल, असं त्यांनी या व्हिडिओत म्हटलं होतं. याच व्हिडिओसंदर्भात ‘एबीपी माझा’ने अमोल मिटकरी यांना बोलतं केलंय. त्यांनी महेश मांजरेकर यांच्या या ऑफर आणि सदिच्छांबद्दल त्यांचं आभार मानलेय.
आपल्या ‘बिग बॉस’ला विचारूनच निर्णय घेऊ – अमोल मिटकरी
आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला ‘बिग बॉस’च्या घरात बोलविण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल त्यांनी मांजरेकरांचं आभार मानतांनाच हा आपला सन्मान असल्याचा म्हटलंय. मात्र, राज्यात सध्या निवडणूका आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचे दिवस असल्यामुळे यासंदर्भात आपण याला वेळ देऊ शकत नसल्याचं मिटकरी म्हणालेय. मात्र, यासंदर्भात आपले बिग बॉस असलेल्या अजितदादांशी बोलूनच पुढचा कोणताही निर्णय घेणार असल्याचं मिटकरी म्हणालेत.
राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि सरकारचं आभार- अमोल मिटकरी
राज्य साहित्य व संस्कृती मंडळ प्रकाशित करत असलेल्या ‘संपूर्ण गडकरी खंड 1’ मधून राम गणेश गडकरी यांचे ‘राज्यसंन्यास’ नाटक वगळण्यात येणारेय. यासंदर्भात राज्य सरकारने आमदार अमोल मिटकरी यांनी नोंदवलेले आक्षेप राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे पाठविले होते. या आक्षेपांवर मंडळाने एकमेताने शिक्कामोर्तब करीत ते खंडातून वगळण्याचा निर्णय घेतलाय. ‘राजसंन्यास’ नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. यासंदर्भात विधिमंडळात हा प्रश्न मांडत पुरावे राज्य सरकारकडे सादर केले होते.
लवकरच सरकार आगामी ‘राम गणेश गडकरी 1’ मधून वगळण्याची अधिकृत घोषणा करणारे. यासंदर्भात आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि सरकारचं आभार मानलेत. सर्वात आधी हा विषय समोर आणणाऱ्या ‘एबीपी माझा’चं विशेष आभार यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी मानले. राज्य सरकार कोणत्याही महापुरुषांची बदनामी खपवून घेणार नसल्याचा इशारा यावेळी आमदार म्हणून मिटकरी यांनी ‘एबीपी माझा’शी बोलतांना दिलाय.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा