अकोला : अकोला शहरात भरदिवसा, गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न (Akola Crime News) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीत कार्यरत असलेल्या 22 वर्षीय युनिट मॅनेजर तरुणीवर, कंपनीच्याच एजंटने कारमध्ये ही जबरदस्ती  (Akola Crime News) करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत तरुणीने थेट आरोपीच्या गुप्तांगावर लाथ मारत स्वतःची सुटका करून घेतली. अकोला शहरातील जठारपेठ चौकात भरदुपारी ही घडली घटना घडली आहे. (Akola Crime News)

नेमकं काय घडलं? 

16 जून रोजी पीडित तरुणी रोजच्या प्रमाणे ड्युटीवर होती. एजंट गणेश ठाकूर याने “कस्टमर कॉल” असल्याचं सांगून तिला सोबत बाहेर नेलं. दोघंही कारने शहरात फिरत होते. सायंकाळी 6 च्या सुमारास जठारपेठ चौकात, एका दूध डेअरीसमोर कार थांबवण्यात आली. अचानक आरोपी कारच्या मागच्या सीटवर आला आणि तरुणीचा हात पकडून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरड केली असता त्याने तिचं तोंड दाबलं, मारहाण केली आणि शरीरसुखाची मागणी करत दबाव टाकला. मात्र पीडितेने आत्मविश्वासाने लढा दिला. तिने त्याच्या गुप्तांगावर जोरदार लाथ मारली आणि कारमधून बाहेर पडत घटनास्थळावरून सुटका केली. (Akola Crime News)

धमकी, मानसिक त्रास आणि कायदेशीर कारवाई 

आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीत कार्यरत असलेल्या 22 वर्षीय युनिट मॅनेजर तरुणीवर, कंपनीच्याच एजंटने कारमध्ये ही जबरदस्ती  (Akola Crime News) करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत तरुणीने थेट आरोपीच्या गुप्तांगावर लाथ मारत स्वतःची सुटका करून घेतली. घटनेनंतरही आरोपीने तिला मोबाईल मेसेजद्वारे धमकी देत बदनामी आणि आत्महत्या  (Akola Crime News) करून गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. अखेर या सर्व प्रकाराची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात करण्यात आली. आरोपी गणेश ठाकूरविरुद्ध BNS कलम 75(2), 76, 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचं वाहनही पोलिसांनी जप्त केलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. (Akola Crime News)

महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

या घटनेमुळे कार्यालयीन जागेत किंवा सहकाऱ्यांसोबत होणाऱ्या व्यावसायिक संवादांतील सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. महिलांनी अशा प्रसंगी घाबरून न जाता, प्रसंगावधान ठेवून जशी या तरुणीने शौर्य दाखवलं, तसं सामर्थ्याने उभं राहण्याची गरज आहे. आपण सर्वांनी महिला सहकाऱ्यांचा आदर राखत सुरक्षित कार्यसंस्कृती तयार करणं, ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.

आणखी वाचा



Source link