Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमध्ये भाजपातील (BJP) राजीनामा सत्र सुरूच असल्याचे पुढे आलंय. काल मुर्तीजापुर (Murtijapur) तालुक्यातील तीनशेहून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेय. त्यानंतर आज या मतदारसंघातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या जवळपास 200 च्या वर कार्यकर्त्यांनी पक्षाकडे राजीनामे दिलेयेत. दुसऱ्या यादीतही नाव नसल्याने अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळेंचं तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतीय. पिंपळेंऐवजी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या रवी राठींना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने मुर्तीजापूरमध्ये भाजपमध्ये धुसफुस वाढली आहे. याविरोधात आज बार्शीटाकळी तालूक्यातील शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतलाय.
हरीश पिंपळेचं तिकीट कापल्याच्या चर्चेने धुसफुस
यामध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष, शहर प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी हरीश पिंपळीशिवाय दुसरा उमेदवार चालून घेणार नसल्याचा इशारा पक्षाला दिलाय. हे सर्व कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडमध्ये असल्याने त्यांना भेटायला नांदेडकडे निघाले आहेत. पक्ष उमेदवारी देणार नसेल तर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केलाय. त्यामुळे मुर्तीजापुरमध्ये हरीश पिंपळेचं तिकीट कापत नव्या चेहऱ्याला संधी दिली जाते? की हरीश पिंपळेचं तिकीट नक्की होतं, तसेच असे न झाल्यास ते काही वेगळी भूमिका घेतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नक्की झाले काय?
शनिवारी रात्री हरीश पिंपळेंच्या मुर्तिजापूर येथील लकडगंज भागातील घरासमोर मतदार संघातील भाजपचे शेकडो संतप्त कार्यकर्ते एकत्र आलेत. पक्षाने हरीश पिंपळेंना भाजपने उमेदवारी दिली नाही तर मतदारसंघातले 390 बुथ प्रमुख, शाखाप्रमुख पदाधिकारी एकाचवेळी राजीनामा देणार असल्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय. यावेळी हरीश पिंपळे यांच्या समर्थनात मूर्तिजापूर मतदारसंघातले पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांनी घोषणाबाजी केलीय.. मुर्तीजापुर मतदारसंघात आयात केलेला उमेदवार नको. बाहेरील उमेदवाराला संधी दिल्यास, आपण पक्षाचे काम करणार नाही आणि राजीनामा देणार, असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिलाय.
नव्या चेहऱ्याला देणार संधी?
मुर्तिजापूर मतदारसंघात रवी राठींऐवजी शरद पवार गटाने सम्राट डोंगरदिवेंना उमेदवारी़ दिली आहे.. त्यामूळे रवी राठी नाराज होते. त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली होती. आणि भाजपची वाट धरली आहे. 2019 मध्ये रवी राठींनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर मुर्तीजापुरमधून 42 हजार मते घेतली होती. महायुतीत मुर्तीजापुर मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळं भाजप मुर्तीजापूरमधून विद्यमान आमदार हरीश पिंपळे ऐवजी आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता असल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यातील एकमेव राखीव असलेला विधानसभेचा एकमेव मतदारसंघ म्हणजे मुर्तीजापूर. मुर्तीजापूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महाराष्ट्र निर्मितीनंतर एक अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देणारा मतदारसंघ ठरला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..