Akola News अकोला : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) आज परत नव्याने भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवलाय. भाजपनं आमची मतं घेतलीत. परंतू, त्यांची मतं भाजपला मिळालीच नसल्याच्या गंभीर आरोपाचा पुनरूच्चार मिटकरींनी केलाय. ते अकोल्यात बोलत होते. भाजपला राज्यात मिळालेल्या 9 जागा अजित पवार (Ajit Pawar) आणि शिंदेंच्या शिवसेनेमूळेच मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय. भाजपची मतं मिळाली असती तर आमचा बारामतीसह चार जागांवर पराभव झालाच नसता, असंही मिटकरी म्हणालेय. त्यामुळे मिटकरी़च्या या वक्तव्यामुळे महायुतीत (Mahayuti) आता पुन्हा नव्याने वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आम्हालाही त्याच भाषेत बोलता येतं, मात्र..
लोकसभेच्या पराभवासाठी (Lok Sabha Election ) अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी पक्षाकडे अनेकांनी बोट दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना त्यात आता आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा पुनरूच्चार करत भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान, अजित पवारांना जाणीवपुर्वक डावललं गेलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला होता. त्यावर भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी मिटकरींवर टीका करतांना त्यांचा आवाका आणि कुवत काढली होती. त्यावर अमोल मिटकरींनी आपल्यालाही दरेकरांच्या भाषेत बोलता येतं. मात्र, आपल्यावरील संस्कारामुळे आपण असो बोलणार नसल्याचा टोलाही मिटकरींनी दरेकरांना लगावलाय.
भाजपच्याच चुकीच्या धोरणांमुळे भजपचा पराभव झाला
एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहे. आधी लोकसभा आणि नंतर राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असूनही संधी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच नाराज असलेले छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र आज संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत हा दावा खोडून काढला आहे. तर दुसरीकडे लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांचा बळीचा बकरा करण्यात आला आहे. तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात आला, असे वक्तव्य करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनीही अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांसह भाजपवरही हल्लाबोल केला. दादांना वेगळे होण्यास भाग पाडायचं ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडल्याची चर्चा आहे. भाजपचा पराभव केवळ दादांमुळे नाही, तर भाजपच्याच चुकीच्या धोरणांमुळे झालाय, असेही रोहित पवार म्हणाले. त्यामुळे सध्याच्या राजकारणात एकमेकांवरील दावा प्रतिदावा आणि टीकेतून पुढे काय राजकीय गणिते जुळतात की आणखीन बिघडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..