Amol Mitkari : राज्यातील भाजप आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्याविषयी तक्रारी केल्याची बातमी समोर आली होती. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजप आमदारांना उतावीळपणापेक्षा जरा दमानं घेण्याचा सल्ला दिला आहे. अजित पवारांची तक्रार करणाऱ्या भाजपा आमदारांनाच अमित शाह यांनी त्यांच्यासारखं काम करण्याच्या कानपिचक्या दिल्याचे मिटकरी म्हणाले.

संभाजी भिडेंवर अमोल मिटकरींनी केली टीका 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा हद्दपार करण्याची भाषा करणाऱ्या संभाजी भिडेंवर मिटकरींनी टीका केली आहे. अशा पद्धतीने बोलण्याची भिडेंसारख्यांची हिंमत होतेच कशी? असा सवाल त्यांनी केला आहे. संभाजी भिडेंना कुत्रा नेमकं कुठे चावला होता? अशी शंका निर्माण होते असेही मिटकरी म्हणालेत. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिवस साजरा करण्यासाठी राज्यातील लाखो शिवभक्त समर्थ असल्याचे मिटकरी म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर भाजपच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात नाराजी सूर व्यक्त केला. अजित पवारांच्या कुरघोड्यांना रोखा, असे म्हणत भाजप आमदारांनी अमित शाह यांच्याकडे साकडे घातले. यावर अमित शाह यांनी भाजपच्या आमदारांना कानमंत्र दिला आहे. भाजप आमदार अमित शाह यांच्याकडे अजित पवारांबाबत तक्रार घेऊन गेले. यावर उलट अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत, असा कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांची तक्रार करु नका, उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशी सूचना अमित शाह यांनी दिल्या. आपल्या आमदारांची संख्या अधिक,अशात मागे हटू नका, प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असं अमित शाह यांनी आमदारांना म्हणाले. आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचं आहे, असंही अमित शाह यांनी सांगितले. 

2024 साली विधानसभेत भाजपा आमदारा समोर पराभूत उमेदवाराना ताकद देण्याचे काम मुद्दाम अजित पवार करत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अजित पवार मुद्दाम भाजपा ताकद कमी करू पाहत असून भाजपा विरोधकांना ताकद देताय, याकडे लक्ष द्यावे…अशी तक्रारी पाढाच भाजपा आमदारांनी मंत्री यांनी अमित शाहा समोर मांडला. 

महत्वाच्या बातम्या:

अमोल कोल्हे अन् जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच एकीची चर्चा; आ. मिटकरींनी ठेवली अट

अधिक पाहा..



Source link