Maratha Reservation : मराठा बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आरक्षणासाठी आंदोलनाची हाक त्यांनी दिली आहे.
अशातच मनोज जरांगे पाटील हे सकाळी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने आंदोलकांसह रवाना झाले आहेत. अशातच आता जरांगे यांच्या आंदोलनाबाबत हाय कोर्टात वाद सुरु होता.
मुंबई पोलिसांकडून एक दिवसाची परवानगी
अशातच आता मनोज जरागेंच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी एका दिवसाची परवानगी दिली आहे. मुंबईत आंदोलन करण्यासाठी एक दिवसाची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. यामध्ये शनिवारी, रविवारी आंदोलनाला परवानगी नसणार आहे.
मुंबई पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी देण्यात आली असून यामध्ये 5 हजार आंदोलकांना सहभागी होता येणार आहे. तसेच या आंदोलनाला अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे.
‘एका दिवसात आरक्षण द्या’
मात्र, पोलिसांनी दिलेल्या परवानगीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की, मुंबई पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. आम्ही नियमांचं पालन करून आंदोलन करणार. परवानगी दिली असेल तर स्वागत मात्र एक दिवसांचं परवानगी मान्य नसल्याचं मनोज जरांगे यावेली म्हणाले. तसेच एका दिवसात आरक्षण द्या आंदोलन मागे घेतो असं देखील मनोज जरांगे म्हणाले.
मराठा आंदोलनाला एका दिवसासाठी परवानगी
– सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या नाहीत
– आंदोलकासोबत 5 वाहनांना परवानगी
– 5 हजार आंदोलकांना परवानगी
– 7 हजार चौरस मीटर आंदोलनासाठी राखीव जागा
– मोर्चा दुसरीकडे नेता येणार नाही
– ध्वनीक्षेपक, गोंगाट करणारी उपकरणं वापरण्याला मनाई
– आंदोलनासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंतची वेळ
FAQ
1. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी कोणते आंदोलन जाहीर केले आहे?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसी प्रवर्गात 10% आरक्षण मिळावे यासाठी 29 ऑगस्ट 2025 पासून मुंबईतील आझाद मैदानावर अनिश्चित काळासाठी उपोषण आणि आंदोलन जाहीर केले आहे.
2. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे का?
होय, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एका दिवसासाठी (29 ऑगस्ट 2025) सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, शनिवार आणि रविवारी (30 आणि 31 ऑगस्ट) आंदोलनाला परवानगी नाही.
3. मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी कोणत्या अटी ठेवल्या आहेत?
आंदोलनात फक्त 5,000 आंदोलकांना सहभागी होण्याची परवानगी आहे.
आंदोलन शांततापूर्ण असावे आणि कोणत्याही प्रकारे सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होऊ नये.
गणेशोत्सवाच्या काळात (27 ऑगस्टपासून सुरू) मुंबईतील वाहतूक आणि उत्सवात व्यत्यय येऊ नये याची काळजी घ्यावी.
आंदोलकांनी मुंबई पोलिसांनी नियुक्त केलेल्या मार्गाचे पालन करावे.