Nagpur-Mumbai High Speed Bullet Train: मुंबई-अहमदाबाद हा महाराष्ट्रातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाच्या कामाला वेग आला आहे. अशातच चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची. हा प्रकल्प विदर्भातील महत्वाच्या शहराला जोडणार आहे. या मार्गावर 320 किमी प्रति तास स्पीडने ट्रेन धावणार आहे. यामुळे 844 किमीचा प्रवास फक्त साडेतीन तासात पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही माहिमन्यांपूर्वी महाराष्ट्रातील या दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा केली होती.
हे देखील वाचा…
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा महाराष्ट्रातील पहिला आणि सर्वात मोठा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचे काम केले जात आहे. 508 कि.मी. लांबीचा हा मुंबई ते अहमदाबाद असा बुलेट ट्रेनचा कॉरीडॉर आहे. त्यापैकी 2 किलोमीटरचा मार्ग जमिनीखालून जाणार आहे. या बोगद्याची खोली जमिनीखाली 25 ते 65 मीटर इतकी असेल.असून बोगद्याचे खोदकाम तीन महाकाय मशीनच्या मदतीने करण्यात येत आहे. हा बोगदाच मुंबईत-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा हा महत्त्वाचा भाग असणार आहे. बोगदा बीकेसी आणि शिळफाट स्थानकांदरम्यान असणार आहे. ठाण्यात 7 किमी बोगदा खोदला जात आहे. हा बोगदा तयार करण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड यांचा वापर केला जात आहे. त्यातून तब्बल ताशी 320 किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेवर एकूण 12 स्थानके असणार आहेत. यामधील आठ स्थानकांची गुजरातमध्ये, तर चार स्थानकांची महाराष्ट्रात उभारणी केली जाणार आहे. यामध्ये वांद्रे – कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई ते नागपूर हा महाराष्ट्रातील दुसरा बुलेट ट्रेन प्रकल्प असणार आहे. यामुशे मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत करता येणं भविष्यात शक्य होईल. या मर्गावर ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. 766 किमी लांबीचा हा मार्ग असेल. या मार्गावर 13 स्टेशनं असतील. नागपूर, खापरी, वर्धा, पुलगाव, करंजा लाड, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर या ठिकाणी ही स्टेशन्स बांधण्यात येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर झाला होता. राज्यात नविन सरकार सत्तेत आल्यावर या प्रल्पाला प्रत्यक्षात गती मिळेल अशी चर्चा रंगली आहे.