IT Park now the Ctriple IT center : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क मधील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्रात दोन नवीन आयटी पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक आयटी पार्क पुरंदर येथे तर दुसरे आयटी पार्क सातारा जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. साताऱ्यात  राज्यात तिसरे मोठ्या IT पार्क उभारण्याआधी 1,15,00,00,000 रुपयांचे ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

साताऱ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲन्ड ट्रेनिंग सेंटर उखखखढ (‌‘सीट्रिपलआयटी‌’) स्थापन केले जामार आहे. या संदर्भातील प्रस्ताव टाटा टेक्नॉलॉजीजने राज्य सरकारकडे सादर केला आहे. हा प्रकल्प 115 कोटी रुपयांचा आहे. यासंदर्भात कंपनीने मुख्यमंत्री तसेच  उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून प्रकल्पाची माहिती दिली आहे. सातारा शहर लवकरच आयटी हब म्हणून उदयास येणार आहे. सातारा आयटी पार्क प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. लिंब खिंड नागेवाडी परिसरात हे नवे आयटी पार्क उभारले जाणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांन या IT पार्कच्या उभारणीसाठी  सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. 

साताऱ्यात IT पार्क उभारण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु असतानाच आयटी सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  टाटा टेक्नॉलॉजीजच्या सीआयआयआयटी प्रस्तावामुळे येथील आयटी पार्कला आणखी बळकटी येणार आहे. ‌‘टाटा टेक्नॉलॉजी‌’ कंपनीने केंद्र मंजुरीचे पत्र राज्य शासनाला पाठवले असून टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून सातारा येथे लवकरत हे नवीन केंद्र उभारले जाणार आहे. 

या नव्या ‘सीट्रिपल आयटी’ सेंटरमुळे सातारा जिल्ह्यातील तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‌‘एआय‌’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र मंजुरीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल शिवेंद्रराजे यांनी दोघांचेही आभार मानले आहेत.
उद्योगक्षेत्रात तंत्रज्ञानाच्या जलद बदलामुळे कौशल्याधारित प्रशिक्षणाची गरज वाढली आहे.  सध्याची व्यावसायिक प्रशिक्षण प्रणाली स्पर्धात्मक उद्योगमानकांशी जुळत नसल्याचे टाटा टेक्नॉलॉजीजने नमूद केले आहे. तंत्रज्ञानातील प्रगती, नवीन मॉडेल्स आणि उद्योग 4.0 कौशल्यांमुळे रोजगार संधी बदलत आहेत, परंतु विद्यमान शैक्षणिक पद्धती मागे पडत असल्याने कुशल मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सीआयआयआयटी सेंटरमुळे नवा बदलाव येणार आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजने कर्नाटक, तामिळनाडू, बिहार आणि आसाम या राज्यांत असे कौशल्यविकास केंद्र यशस्वीरीत्या उभारले आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली येथेही राज्य सरकारच्या सहकार्याने असेच प्रकल्प राबवले आहेत. आता साताऱ्यात उद्योग 4.0 कौशल्यांसाठीच्या प्रशिक्षणाची उणीव भरून काढण्यासाठी सीआयआयआयटी उभारण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक उपकरणे, प्रयोगशाळा, सुविधा उन्नतीकरण, अभ्यासक्रम पुनर्रचना व नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा समावेश होणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यावर दरवर्षी सुमारे 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रस्तावित प्रकल्पाची एकूण रक्कम 115 कोटी असून, त्यातील 15 टक्के हिस्सा साताऱ्यातून उभारला जाईल. उर्वरित खर्च टाटा टेक्नॉलॉजीज व उद्योग भागीदार उचलणार असल्याचे या संदर्भातील पत्रात नमूद आहे.

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp