Siddhivinayak Temple Mumbai : महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची धूम पहायला मिळत आहे. अनेक जण गणेशोत्सवात आवर्जून सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जातात. भाविकांची रीघ लागली आहे. जगभर प्रसिद्ध असलेलं मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. भारतातील विविध राज्यातीलच नाही तर जगभरातील भक्त सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिराचा 225 वर्षांपूर्वीचा इतिहास जाणून थक्क व्हाल. महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत सिद्धिविनायक मंदिर कुणी आणि का बांधले? जाणून घेऊया.
असा आहे सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास
225 वर्षांपूर्वी सिद्धिविनायक मंदिर बांधल्याच्या नोंदी सापडतात. देऊबाई पाटील नावाच्या महिलेने सिद्धिविनायक मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. माटुंगा परिसरात राहणाऱ्या देऊबाई पाटील या सधन घरातील महिला होत्या. देऊबाई पाटील यांना मूल होत नव्हते. त्यांच्या घरी सिद्धिविनायक गणपतीचे छायाचित्र होते. त्या दररोज मनोभावे या तसबीरीची पूजा करायच्या. मूल झाल्यास मी सिद्धिविनायकाचे मंदिर बांधने असा नवस त्यांनी केला. त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना मूल झाले.
मूल झाल्यानंतर त्यांनी आपला नवस पूर्ण केला. सन 1801 मध्ये त्यांनी सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर बांधले. याचा सर्व खर्च पाटील कुटुंबानेच केला. मूळातील सिद्धिविनायकाचे मंदिर हे खूप लहान होते. सुरुवातीला विटांचा वापर करुन हे घुमटाकार रचना असलेले या मंदिराचे बांधण्यात आले होते. जीर्णोद्धार करून या मंदिराला भव्य स्वरुप देण्यात आले.
असे जगप्रसिद्ध झाले सिद्धिविनायक मंदिर
सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेली कोणतीही महिलांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळावा अशी देऊबाई पाटील यांची इच्छा होती. अनेक महिला नवस पूर्ण झाल्याचे सांगतात. सिद्धिविनायकाच्या दर्शनाने मनातील इच्छा पूर्ण असे भाविक सांगतात. यामुळेच फक्त भरातातूनच नाही तर जगभरातील भक्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिराचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणताच भेदभाव केला जात नाही. या मंदिराची द्वारे सर्वांसाठी खुली असतात. कोणत्याही जाती, धर्म, पंथाच्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश दिला जातो.
मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर हे भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. सर्व जाती धर्माचे सर्वसामान्य नागरिक ते अगदी लोकप्रिय सेलिब्रेटीं बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन मंदिरांना स्थान मिळाले आहे. यापैकी एक मंदिर हे मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडे 160 किलो सोने आहे. मंदिराचा गाभारा हा 3.7 किलो सोन्याने मढवलेला आहे. देणगी आणि प्रसादातून मंदिराला वर्षाला सुमारे 125 कोटींपेक्षा जास्त रुपये मिळते. या मंदिराचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त मंडळही देशातील श्रीमंत विश्वस्त मंडळाच्या यादीत समाविष्ट आहे. मंदिराला दान स्वरुपात मिळालेली देणगी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातुन अनेक लोकोपयोगी, समाजपयोगी वापरली जाते. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातुन वैद्यकिय, शैक्षणिक तसेच गरजूंनाआर्थिक मदत केली जाते. राज्यात संकटकाळी सिद्धिविनायक ट्रस्ट सामान्यांच्या मदतीला धावून जातो. सिद्धिविनायक मंदिराकडून करण्यात आलेल्या मदतीची अनेक उदाहरणे पाहिली आहेत.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. )
FAQ
1 सिद्धिविनायक मंदिर कुठे आहे?
सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी परिसरात (पूर्वी माटुंगा परिसरात) आहे.
2 सिद्धिविनायक मंदिर कोणी आणि कधी बांधले?
सिद्धिविनायक मंदिर 1801 मध्ये देऊबाई पाटील नावाच्या महिलेन बांधले. त्यांना मूल होत नसल्याने त्यांनी सिद्धिविनायकाचा नवस केला होता, आणि मूल झाल्यावर त्यांनी हा नवस पूर्ण करून मंदिर बांधले.
3 सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास काय आहे?
225 वर्षांपूर्वी (1801 मध्ये) देऊबाई पाटील यांनी सिद्धिविनायक मंदिराची स्थापना केली. सुरुवातीला हे मंदिर लहान आणि विटांनी बांधलेले घुमटाकार रचनेचे होते. नंतर जीर्णोद्धार करून मंदिराला भव्य स्वरूप देण्यात आले.