BJP MLA Controversial Speech: नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे शनिवारी रात्री आयोजित धर्मासभेत हैद्राबादचे वादग्रस्त भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी महाराष्ट्रातील सगळे मदरशे बंद करण्याची मागणी केली आहे. एवढ्यावरच न थांबता प्रत्येकाच्या घरात पाच-पाच बंदुका असल्या पाहिजेत असंही या भाजपा आमदाराने जाहीर भाषणामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री नितेश राणेंसमोर म्हटलं आहे. सध्या या आमदाराच्या भाषणाची जोरदार चर्चा आहे.

Add Zee News as a Preferred Source

मदरशे विघातक शिक्षण देतात, असा आरोप

मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याला माझे समर्थन आहे. महाराष्ट्रातील सगळे मदरशे बंद करा. महाराष्ट्राच्या मदरशामध्ये देश विघातक शिक्षण देत आहे त्यामुळे मदरशे बंद करा. अनाधिकृत मदरशे बंद करण्या पेक्षा उध्वस्त करा असे वक्तव्य हैद्राबादचे आमदार टी राजा सिंह यांनी केले.  त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मदरशांवर बुलडोजर चालवण्याची गरज

“आपल्या महाराष्ट्रात बुलडोजरचा नियम लागू झाला आहे. जर मदरशे बंद केले तर पुन्हा चालू होतील. त्यामुळे अनाधिकृत मदरशांवर बुलडोजर चालवण्याची गरज आहे. दाऊद इब्राहिम आणि अफजल कसाब अश्याच मदरशातून तयार झालेत. मदरशामध्ये शिकवलं जाते हिंदूंची हत्या करा. नितेश राणेंना माझे निवेदन आहे, तुम्ही बोललेल्या वक्तव्याची अमलाबजावणी करा,” असं  राजासिंह म्हणाले

औंरंगजेबची कबर उखाडून शौच्छालय बांधा

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना औरंगजेबची कबर हटवण्यासाठी भीती का वाटतं आहे. तुम्हाला वाटते की तुम्हाला मतदान मिळणार नाही, ते तुम्हाला मतदान करणार नाही हे लिहून घ्या,” असंही टी राजा सिंह म्हणाले.  “मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे, महाराष्ट्रच्या हिंदूंना वाटत आहे औरंगजेबची कबर उखडून तिथे शौचालय बांधा,” असे वक्तव्य आमदार टी राजा सिंह यांनी केले. “औरंग्याची कबर महाराष्ट्रासाठी नको आहे. माझ्या संभाजी राजाला हालहाल करून मारलं. ती कबर उखडवण्यासाठी मावळे हवे असतील तर लाखोने येऊ,” असेही टी. राजासिंह म्हणाले

घरात शस्त्र ठेवा

घरात शस्त्र ठेवण्याचा सल्लाही टी. राजासिंह यांनी दिला. “देवाच्या गाभाऱ्यात शस्त्र ठेवणे कायदेशीर आहे. बाहेर काढून हल्ला केला तर तो वेगळा विषय आहे. जर युद्ध झालं. शस्त्र नसतील तर, तुम्ही काय करणार? कसं लढणार धर्मासाठी? लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. जिथे मदत लागेल तिचे आम्ही घेऊन देऊ. एका एका घरात पाच-पाच बंदूका असल्या पाहिजेत. देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले, त्यांना गोळी मारण्यासारखे हत्यार राहिले पाहिजे,” असे आमदार टी. राजा सिंह म्हणाले.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp