Palghar Crime News: पालघर जिल्ह्यातील कासा येथे एक महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. जनतेचे रक्षकच भक्षक बनले आहेत. एका पोलीस हवलदाराने तक्रारी अर्जाच्या चौकशीसाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका तक्रारी अर्जाच्या चौकशीसंदर्भात कासा पोलीस ठाण्यात आली होती. तेव्हा याच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या शरद भोगाडे नावाच्या पोलीस हवलदाराने चौकशीच्या बहाण्याने पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या खोलीत नेले. त्याच ठिकाणी आरोपी पोलीस हवालदाराने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. महिलेने मोठे धाडस दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलीस हवालदार भोगाडे याच्यावर लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, पुढील तपासासाठी गुन्हा कासा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती माहिती मिळाली आहे. आरोपी हवालदार बुगडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी कासा पोलीस ठाण्याच्या प्रभारीची तातडीने जिल्हा मुख्यालयात बदली केली आहे. तसेच या प्रकरणी सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.
नाशिकमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार
मालेगाव पाठोपाठ आता मनमाड शहरात ही अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी 64 वर्षीय बाबा भागवतला अटक करून त्याच्या विरुद्ध ऍट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या नराधमाने एका 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला शिवाय तो शहरातील एका भागात असलेली लॉन्ड्रीच्या दुकान प्रेस करण्यासाठी कपडे घेऊन येणाऱ्या लहान मुलांशी अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे डिवायएसपी बाजीराव महाजन यांनी सांगितले.
FAQ
-
ही घटना पालघर जिल्ह्यात नेमकी कुठे घडली आहे?
ही घटना पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
2. आरोपी कोण आहे?
आरोपीचे नाव शरद भोगाडे आहे, जो कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस हवालदार आहे.
3. पीडित महिला पोलीस ठाण्यात कशासाठी आली होती?
पीडित महिला एका तक्रारी अर्जाच्या चौकशीसंदर्भात कासा पोलीस ठाण्यात आली होती.
4. आरोपीने महिलेवर कुठे लैंगिक अत्याचार केला?
आरोपी पोलीस हवालदाराने चौकशीच्या बहाण्याने पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या खोलीत महिलेवर लैंगिक अत्याचार केला.