Nashik Kumbh Mela: नाशिकमध्ये 2027 सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची कामे गतीमान करण्यासाठी मनपाने तीनशे कोटींचे कर्ज काढण्याची तयारी केलीय. तर दुसऱ्या बाजूला सीएसआर निधीतून कामे करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. कुंभमेळ्यासाठी अवघी दोन वर्षे शिल्लक असताना शासकीय निधी अपुरा असल्याने स्थानिक प्रशासन अडचणीत आलय.

नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा आता 2027 मध्ये होणाराय. या कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधा आणि इतर नियोजनासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून किमान दहा हजार कोटी रुपयांची अपेक्षा विविध शासकीय खात्यांनी व्यक्त केली होती… मात्र सरकारनं केवळ दहा टक्के निधी दिल्याने आता कुंभमेळा आयुक्तांनी थेट सीएसआर निधी शोधण्याचे आदेश विविध विभागांना दिलेत. उद्योग, बँका आणि व्यावसायिक संस्थांकडून सहकार्य मागवण्यात आलंय. बहुतेक कामं सीएसआर अंतर्गत होतील… यादी दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश आयुक्त तथा सिंहस्थ प्रभारी करिष्मा नायर यांनी विभाग प्रमुखांना दिलेत

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 15 हजार कोटींचा आराखडा तयार आहे. पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव, मात्र अद्याप निधी नाही. त्यामुळे नाशिक मनपाची 300 कोटींचं कर्ज घेण्याची तयारी आहे. उर्वरित निधी सीएसआरमधून मिळवणार आहेत. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. 

कुंभमेळा म्हटलं की राज्य आणि केंद्र सरकारचा भरपूर निधी असं समीकरण असतं. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाड आहेत. तर अद्याप केंद्राचा निधी नाहीय. त्यामुळे नाशिक मनपा ऋण काढून सण साजरा करणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 

FAQ 

१. नाशिक सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी नाशिक महानगरपालिका (मनपा) कोणती आर्थिक तयारी करत आहे?

नाशिक मनपाने कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांसाठी 300 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची तयारी केली आहे. तसेच, उर्वरित निधी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अंतर्गत उद्योग, बँका आणि व्यावसायिक संस्थांकडून मिळवण्याचा निर्णय घेतला आहे.

२. कुंभमेळ्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे आणि किती निधी मिळाला आहे?

कुंभमेळ्यासाठी 15,000 कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून किमान 10,000 कोटींची अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत केवळ 10% निधी मिळाला आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासन अडचणीत आहे.

३. निधीच्या कमतरतेमुळे कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?

कुंभमेळा आयुक्त करिष्मा नायर यांनी विविध विभागांना सीएसआर निधीतून कामे करण्याचे आदेश दिले आहेत. उद्योग आणि बँकांकडून सहकार्य मागवले असून, दोन दिवसांत यादी सादर करण्यास सांगितले आहे. तसेच, मनपा 300 कोटींचे कर्ज घेणार आहे.

४. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधी संदर्भात काय अडचणी आहेत?

राज्य सरकारच्या तिजोरीत आर्थिक अडचणी असल्याने आणि केंद्र सरकारकडून अद्याप पुरेसा निधी मिळाला नसल्याने नाशिक मनपाला कर्ज आणि सीएसआर निधीवर अवलंबून राहावे लागत आहे.

५. यावर राजकीय प्रतिक्रिया काय आहे?

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर टीका करत सांगितले की, कुंभमेळ्यासाठी नेहमी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठा निधी मिळतो, परंतु यावेळी निधीअभावी मनपा कर्ज काढून सण साजरा करत आहे, ज्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.





Source link