अकोला : बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचं ठिय्या आंदोलन अखेर सात तासांनंतर मागे घेण्यात आलं. देशमुख यांच्या आंदोलनानंतर अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शाखा अभियंता राजेंद्र इंगळे यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. तर उपविभागीय अधिकारी डी. बी कपिले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता एस.एस. गव्हाणकर यांनी हे आदेश दिलेत.

अधिकाऱ्यांची महिलेकडे शरीरसुखाची मागणी

अकोला येथील नेहरू पार्क चौकातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विभागीय कार्यालयात आमदार नितीन देशमुखांची ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मूर्तीजापूर कार्यालयातील उपविभागीय अधिकारी डी. बी. कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे यांनी एका महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात त्यांनी केला.‌

यासंदर्भात मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही दोन्ही आरोपींवर कारवाई करण्यास प्रशासनानं टाळाटाळ केली होती. त्यामुळे देशमुखांनी शिवसैनिक आणि पिडीत महिलेसह आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा आरोप

अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप केले. लक्षवेधी मांडू न देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाले असा आरोप देशमुखांनी केला. महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नितीन देशमुखांनी केली होती. मात्र ही लक्षवेधी येऊ न देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी टाळाटाळ केली, ते मॅनेज झाले असा आरोप देखमुखांनी केला.

दोन अधिकाऱ्यांवर आरोप

मूर्तिजापूरच्या जीवन प्राधिकरण कार्यलयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेकडून शाखा अभियंता राजेंद्र इंगळे आणि उपविभागीय अधिकारी डी. बी कपिले यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप त्या महिलेनेच केला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link