अकोला : आपण औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवल्याच्या कृतीमुळे राज्यातील दंगली थांबल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. ते अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे अकोला पूर्व आणि मुर्तीजापुर मतदारसंघातील वंचितच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते. गेल्या वर्षी प्रकाश आंबेडकरांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर राज्यात मोठा राजकीय गदारोळ उडाला होता.

जातीच्या आधारावर मतदान करत असाल तर माती खाल असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना दिला. निष्ठावंत कार्यकर्ते आणि पक्षाला मतदान केलं तरच तुमचा विकास होऊ शकतो असं आवाहनही आंबेडकरांनी मतदारांना केलं. 

ठाकरे-शिंदेंच्या जागी वंचितला मतदान करा

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये लढत असलेल्या राज्यातील 32 मतदारसंघात मुस्लिमांनी आपल्याला पाठिंबा द्यावं असं आवाहन आंबेडकरांनी केलंय. हे दोन्ही पक्ष बाबरी मस्जिद विद्ध्वंसासाठी कारणीभूत असल्याचं आंबेडकर म्हणाले. जर या मुद्द्यावर मुस्लिमांकडून मदत मागणे हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी शंभरदा करेन असंही आंबेडकर म्हणाले. राज्यात आपले 35 आमदार आले तर आपण विधानसभेत मोहम्मद पैगंबर बिल आणणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले. 

दंगली थांबवण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीवर

गेल्या वर्षी जून महिन्यात प्रकाश आंबेडकरांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली होती. त्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले होते की, या आधी जो चुकीचा समज तयार करण्यात आला आहे किंवा हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न के जात आहे तो थांबवण्यासाठी मी हे कृत्य केलं. माझ्या या प्रयत्नांना यश आलं असं मी समजतो. औरंगजेबाच्या नावाने ज्या दंगली होत आहेत त्या आता होणार नाहीत. 

मुस्लीम समाजाला आवाहन

या आधीही प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला आवाहन केलं होतं. ते म्हणाले होते की, “नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत संविधान डोक्यावर घेतात, बायबल आहे असे सांगतात. मी मुस्लिम समाजाला आव्हान करतो, मागच्या पाच वर्षात खूप हल्ले झाले आहेत. त्यावेळी, वंचित बहुजन आघाडीच आपल्या पाठीमागे उभी राहिली, बाकी कोणी आले नाहीत. राज्यातील विधानसभा मतदारसंघात 32 जागा अशा आहेत, जिथे शिवसेनेच्या दोन गटांमध्ये थेट लढत होत आहे. तेथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही मैदानात आहेत. शिवसेनेचे दोन्ही गट तुमच्या बाजूने नाहीत, म्हणून मौलविना माझा प्रश्न आहे आमच्या बाजूने या.”

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link