Mumbai Traffic Update: सामान्यपणे तुम्ही मुंबई आणि उपनगरांमध्ये राहत असाल तर रविवारी रेल्वेच्या मेगाब्लॉक असल्याच्या बातम्या अनेकदा वाचल्या असतील. मात्र मुंबईला गुजरातशी कनेक्श करणाऱ्या एका महत्त्वाच्या मार्गावर उद्या म्हणझेच 7 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक असणार आहे. शहरातील वाहतुकीचा महत्त्वाचा भाग असलेल्या या रस्त्यावर तुम्ही उद्या चुकून गेलाच तर डिसेंबरमधील पहिलाच रविवार तुमचा वाहतूककोंडीमध्ये जाऊ शकतो.
रस्ता कोणता आणि काय काम सुरु आहे?
मुंबईकडून गुजरातला जाणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी एक असलेला राज्य महामार्ग 84 म्हणजेच घोडबंदर रोडवरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गायमुख ते फाऊंटनदरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामातील अंतिम टप्प्यात आहे. रविवार, 7 डिसेंबर रोजी याच कामाचा एक भाग म्हणून ग्राऊटिंग व मास्टिक अस्फाल्टचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठीच घोडबंदर रोड अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे.
संपूर्ण रस्ता कधी बंद असणार?
शनिवार मध्यरात्री 12 ते रविवार मध्यरात्री 12 या कालावधीत संपूर्ण रस्ता बंद राहणार आहे. यावेळी प्रवाशांची वाहतूककोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी अनेक त्रास प्रवास
मेट्रोची कामे, अरुंद-नादुरुस्ती रस्त्यांमुळे व अवजड वाहनांची वाहतूक यामुळे घोडबंदर प्रवास जीवघेणा आणि त्रासदायक झाला असून प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. अर्ध्या तासाचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना अनेक तासांच्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतोय. हे कमी म्हणून की काय नादुरुस्त रस्त्यामुळे घोडबंदरवर अपघात होऊन अनेकांचे बळीदेखील गेले आहेत. मात्र अपघातांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी तसेच वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम आता शेवटच्या टप्प्यात आले असून रस्त्याचे ग्राऊटिंग व मास्टिक अस्फाल्टचे काम रविवारी पूर्ण करण्यात येणार आहे.
कसे असतील निर्बंध:
अवजड वाहनांसाठी: मुंबई आणि ठाणेकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना माजिवडा व्हाय जंक्शन आणि कापूरबावडी चौकात थांबवले जाईल. या वाहनांना 24 तासांसाठी बंदी आहे.
हलकी वाहने: ठाणेकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांना गायमुख चौकीवरून चुकीच्या बाजूने जाण्याची परवानगी आहे, आणि फाऊंटन हॉटेलसमोरच्या कटमधून पुढे जाऊ शकतात.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेद्वारे फाऊंटन हॉटेल ते काजुपाडा भागात दुरुस्ती होत आहे, ज्यामुळे वाहतुक व्यवस्था पूर्णपणे बदलली जाईल.
पर्यायी मार्ग:
मुंबई/ठाण्याकडून: व्हाय जंक्शनवरून सरळ नाशिक रोडमार्गे खारेगाव टोल प्लाझा, मंकोली, आणि अंजुरफाटा मार्गे. कापूरबावडी जंक्शनवरून उजवीकडे वळून कशेळी आणि अंजुरफाटा मार्गे.
मुंब्रा/कलवा येथून: खारेगाव टोल प्लाझापूर्वी थांबवून खारेगाव बे ब्रिज, खारेगाव टोल प्लाझा, मंकोली, आणि अंजुरफाटा मार्गे.
नाशिककडून: मंकोली नाक्यावर थांबवून मंकोली ब्रिजखाली उजवीकडे वळून अंजुरफाटा मार्गे.