Mumbai News Today: मध्य रेल्वेकडून सायन ओव्हर ब्रिज हा पाडून नवीन ब्रिज बांधण्याचे काम सुरू आहे. या ब्रिजला जोडणाऱ्या रस्त्याची उंची ब्रिजच्या प्रमाणात करण्यात येणार आहे. त्यासाछी लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग म्हणजेच एलबीएवरील वाहतूक सहा महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 14 डिसेंबर ते 31 मे 2025 पर्यंत वाहतुकीत हे बदल लागू करण्यात येणार आहेत.
लालबहादूर शास्त्री मार्ग हा नाईक नगर कचरपट्टी जंक्शन ते नरेश माने चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. कुर्ला लालबहादूर शास्त्रीने मार्गाने जाणारी वाहने कचरपट्टी जंक्शन येथून उजवे वळण घेऊन धारावी डेपो रोडने पुढे सायन वांद्रे लिंक रोड, धारावी टी जंक्शन, केमकर चौक तिथून डावीकडून संत कबीर मार्ग ६० फूट रोड यावरून जाता येणार आहे. याचबरोबर इतर पर्यायी मार्गाचा वापर वाहनधारकांनी करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे
असे आहेत पर्यायी मार्ग
कुर्ल्याकडून लाल बहादूर शास्त्री मार्गाने जाणारी वाहने ही कचरपट्टी जंक्शन येथे उजवे वळण घेऊन धारावी डेपो रोडने पुढे सायन-वांद्रे लिंक रोड-धारावी टी जंक्शन केमकर चौक डावे वळण घेऊन संत कबीर मार्गावरुन इच्छितस्थळी जातील.
कुर्ल्याहून एलबीएस मार्गाने जाणारी वाहने ही कचरपट्टी जंक्शन येथे उजवे वळण घेऊन धारावी डेपो रोडने पुढे धारावी वाय जंक्शन येथे डावे वळण घेऊन संत रोहिदासमार्गे अशोक मिल येथे उजवे वळण घेऊन के.के. कृष्णन मेनन (90 फूट रोड) मार्गावरुन इच्छितस्थळी जातील.
वाहतुकीसाठी बंद मार्ग
संत रोहिदास मार्गावरुन अशोक मिल नाका जंक्शन येथून पै.नरेश माने चौकच्या दिशेने जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळं के.के. कृष्णन मेनन मार्ग रोडने अशोक मिल नाका डावे वळण घेऊन संत रोहिदास मार्गाने पुढे वाय जंक्शन येथे उजवे वळण घेऊन धारावी डेपो रोडने नाईकनगर कवरपट्टी जंक्शन येथून पुढे इच्छितस्थळी जातील.
कुंभारवाडा जंक्शन येथून सरळ संत कबीर मार्ग रोडने केमकर चौक येथून उजवे वळण घेऊन सायन माहिम लिंक रोडने टी.जंक्शन येथून उजवे वळण घेऊन सायन वांद्रे लिंक मार्गाने पुढे वाय जंक्शन येथून डावे वळण घेऊन धारावी डेपो रोडने पुढे मार्गावरुन इच्छितस्थळी जातील.