Eknath Shinde : मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलाय. महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार आहे. पण ज्यांचे माजी नगरसेवक जास्त असतील तेवढ्या जागा त्या त्या पक्षाला मिळाल्याच पाहिजेत अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. दरम्यान त्यांनी केलेल्या दाव्यानंतर आता भाजपनंही त्यांची भूमिका मांडलीय.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमधून मोठा दावा केलाय. मुंबई आणि ठाण्यात एकनाथ शिंदेंनी भाजपपेक्षा जास्त जागांची मागणी केलीय. मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेकडे जास्त माजी नगरसेवक असल्यानं एकनाथ शिंदेंनी मुंबईत 120 जागांवर अप्रत्यक्ष दावा केलाय. त्यामुळे जागावाटपावरूनही शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या जागांप्रमाणे एकनाथ शिंदेंची मुंबई आणि ठाण्यात जादा जागांची मागणी आहे. दरम्यान त्यांच्या दाव्यानंतर भाजपकडूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, एकनाथ शिंदेंनी टू द पॉईंट मुलाखतीमधून केलेल्या जागांची मागणीनंतर वक्त वक्त की बात हैं असं म्हणत नितेश राणेंनी सूचक विधान केलंय.
झी 24 तासच्या टू द पॉईंटमधून एकनाथ शिंदेंनी मुंबई आणि ठाण्यात जास्त जागांची मागणी केलीय. पुढच्या महिन्यात पालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीचं बिगुल वाजण्याधीच भाजप- शिवसेनेत वादाचं बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झालीय.
हेही वाचा : ‘बटेंगे तो कटेंगे’वरून राणा विरूद्ध कडू, नगर परिषदेच्या निवडणुकीत कोण कोणावर पडणार भारी? जाणून घ्या!
FAQ :
मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार आहे का?
शिवसेना-भाजपची युती होणार असल्याचे सांगितले जात आहे, पण जागावाटपावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपचे माजी नगरसेवक किती आहेत?
भाजपचे सध्या 85 माजी नगरसेवक आहेत.
एकनाथ शिंदेंनी काय दावा केला आहे?
एकनाथ शिंदेंनी दावा केला आहे की शिवसेनाच मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकीत मोठा भाऊ आहे.