Mungantiwar vs Jorgevar: चंद्रपूर भाजपात पुन्हा एकदा ऑल इज नॉट वेल असं चित्र दिसतंय. महापौरपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी दुस-या उमेदवाराचा अर्ज दाखल केल्याने आमदार मुनगंटीवार संतापल्याची चर्चा आहे. या मुद्द्यावरून मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार आमने-सामने आलेत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष सुरू झाल्यापासून भाजपमधील अंतर्गत वाद चांगलाच चव्हाट्यावर आलाय.  तिकीट वाटपावरून सुरू झालेला वाद, एबी फॉर्म चोरीचा आरोप, किशोर जोरगेवार समर्थक असलेले सुभाष कासनगोट्टूवार यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी आणि त्यानंतर महापौर पदासाठी सुरू झालेली फिल्डिंग या सगळ्या घडामोडींमुळे पक्षातील संघर्ष अधिकच तीव्र झालाय. 

हा वाद मिटवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला. सुधीर मुनगंटीवार यांचा शब्द अंतिम मानत संगीता खांडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. मात्र ऐनवेळी सारिका संदुरकर यांचा अतिरिक्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावरून सुधीर मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त केलीये. 

मुनगंटीवारांच्या नाराजीनंतर आमदार किशोर जोरगेवारांनी स्पष्टीकरण दिलंय.खांडेकरांच्या अर्जात त्रुटी निघाल्यास अडचणी येऊ नयेत म्हणून  संदूरकरांचा फॉर्मा भरून घेतल्याचं जोरगेवारांनी सांगितलंय.वरिष्ठांना विचारून हा निर्णय घेतल्याचे सांगत विधानसभा निवडणूक आणि मनपा निवडणुकीतील बंडखोरीचा विषय काढत जोरगेवारांनी मुनगंटीवारांना डिवचलंय.

या सगळ्या घडामोडींमुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड झालाय.नेतृत्वाचा आदेश अंतिम मानला जाईल की स्थानिक राजकारण वरचढ ठरेल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या नव्या संघर्षाने कार्यकर्ते आणि उमेदवार  मात्र धास्तावलेत.

बीएमसीमध्ये शिवसेनेची ‘ती’ स्ट्रॅटर्जी फेल

भाजपकडून रितू तावडेंना महापौरपदाची संधी देण्यात आली तर सेनेच्या संजय घाडींना उपमहापौर पदाची उमेदवारी पण यावेळी बोलताना महापौरपद न मिळाल्याची सेनेची खदखद मात्र समोर आली. तर कोणत्या पक्षाचा महापौर होईल यापेक्षा मुंबईच्या प्रश्नांवर आता काम करणं जास्त महत्वाचं असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलंय. भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आल्याने भाजपचा महापौर होतोय असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपेंनी म्हटलंय. त्यात शिवसेनेच्या मनातून न मिळालेलं महापौरपद काय जात नाहीये. आता पुढची 5 वर्ष भाजप शिवसेनेला मुंबई महापालिकेत एकत्र काम करावं लागणार आहे.  बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमीत्तानं किमान सुरुवातीचा काही काळ शिवसेनेचा महापौर व्हावा ही इच्छा पुर्ण न होता केवळ उपमहापौरपदावर समाधान मानावं लागलंय.   त्यामुळे येणा-या काळात शिवसेना भाजपचं ट्युनिंग कसं राहतं हे बघावं लागेल.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp