सर्वत्र गणेशोत्सावाची लगबग सुरु असतानाच राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारी 27 ऑगस्टला देशात गणेशाचे आगमन होणार आहे. महिन्याचा शेवट असल्याने अनेक लोकांना गणरायाच्या स्वागत करताना आर्थिक अडचण येऊ शकते. ही गोष्ट लक्षात घेत राज्य सरकाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवसाआधी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्य सरकारकडून शासनकडून सरकारी कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबरला पगार देण्यात येतो. आता या निर्णयानुसार त्यांना येत्या मंगळवारी 26 ऑगस्ट पगार देण्यात येणार आहे. जिल्ह परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारकांन / कुटुंब निवृत वेतन धारक यांनाही हा निर्णय लागू असणार आहे. या निर्णयामुळे, गणेशोत्सव काळात कर्मचाऱ्यांचा मोठा दिलासा मानला जातोय. आता गणेशोत्सवात बाप्पांच्या आगमनाची मोठ्या थाट्यामाट्यात होणार आहे.
गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी
आगामी गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत देखावे दाखवण्यासाठी शेवटचे पाच दिवस दिले जाणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे दिली आहे. याबाबतचा आदेश लवकरच मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत, असेही ते म्हणाले.
कोकणवासायींना टोलमाफी!
२३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.
यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत.