अकोला : येथील एका घटनेनं समाजमन सुन्न झालं आहे. अकोल्यात वर्षीय 78 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाला आहे. अकोला जिल्ह्यातील दाळंबी शेतशिवरात या 78 वर्षीय वृद्धेवर बलात्कार झाला आहे. अकोल्यावरून एसटी बसने गावाकडे परतताना ही वृद्ध महिला दाळंबी येथे राष्ट्रीय महामार्गावर उतरली. त्यानंतर अगदी दाळंबी गावाजवळच्या शेतशिवारातच या वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात आला. मंगळवारी (29 मे) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून रात्री उशिरा बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
तिन्ही आरोपी फरार
घरी सोडतो असं सांगत 30 ते 35 वयोगटातील 3 अज्ञात तरूणांनी हे कृत्य केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिघांपैकी एका तरुणानं या 78 वर्षीय वृद्ध महिलेवर बतात्कार केला असून तिघेही जण फरार आहे. तिन्ही अज्ञात आरोपींचा अकोला पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नेमकी काय आहे संपूर्ण घटना?
अकोला बस स्थानकावरून 78 वर्षीय वृद्ध महिला ही काल दुपारी एसटी-बसनं दाळंबी गावाला जाण्यासाठी निघाली होती. सव्वादोनला दाळंबी गावातच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वृद्ध महिला पोचली आणि तिथे उतरली. येथून गावाकडे पायी जात असताना तिथे तीन जण मोटरसायकलनं आले आणि गावात सोडून देतो, असं सांगत तिला रस्त्यालगत असलेल्या एका लिंबाच्या शेतात घेऊन गेले. तिघांपैकी तीस ते पस्तीस वर्षाच्या एका व्यक्तीनं तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारू अशी धमकीही वृद्ध महिलेला देण्यात आली. या दरम्यान गावातीलच दोन लोक रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेला दिसले. तिने आरडाओरड सुरू केली. आवाज कानावर पडतातच त्या दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली. हे पाहताच अत्याचार करणाऱ्या तिघांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
गावातील दोन्ही व्यक्ती म्हातारी जवळ पोहचताच त्यांनी सुखरूपपणे तिला घरी सोडलं. म्हातारीने आपल्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर लागलीच कुटुंबीयांनी बोरगावमंजू पोलीस ठाणं गाठलं आणि घडलेल्या प्रकरणाबद्दल तक्रार नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
आरोपींना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
या घटनेमुळे या तिन्ही आरोपींना शोधण्याचं मोठं आव्हान बोरगावमंजू पोलिसांसमोर आहे. यासंदर्भात ‘एबीपी माझा’शी बोलताना बोरगावमंजूचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी तिन्ही आरोपींना शोधण्यासाठी पथके तयार केल्याचं सांगितलं. तीनपैकी एका आरोपीनं वृद्धेवर अत्याचार केल्याचं सांगितलं. लवकरच आरोपींना बेड्या ठोकण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
हेही वाचा :
इन्स्टाग्रामवरची ‘भाईगिरी’ पडली महागात; पोलिसांनी कोल्हापूरच्या फाळकुटदादाचा रुबाब झटक्यात उतरवला
अधिक पाहा..