अमरावती :  लोकसभा निवडणुकीत (Loksaba Election) प्रचारासाठी राणा यांच्याकडून यशोमती ठाकूर यांनी पैसे घेतल्याचा आरोप नवनीत राणानी केला. त्यानंतर यशोमती ठाकूर आक्रमक झाल्यात.आमदार रवी राणांवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर राणा दाम्पत्यावर 100 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा टाकणार आहेत. राणा दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई करुन निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी राणा यांच्याकडून यशोमती ठाकूर यांनी पैसे घेतल्याचा आरोप नवनीत राणानी केल्यानंतर यशोमती ठाकूर आक्रमक झाला आहे. नवरा बायको जिल्ह्याचं वातावरण खराब करत आहेत. निवडणूक आयोग झोपा काढत आहे का? ईडी काय करत आहे? देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.पण त्यांना दहीहंडी कार्यक्रमात यायला वेळ आहे, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

नवनीत राणा यांचं यशोमती ठाकूरांना आव्हान

हर्मन्स कंपनी उद्धव ठाकरेजींनी अमरावतीमध्ये आणलेली ही कंपनी आहे. तु्म्ही हर्मन्स कंपनीचे आणि रेमन्स कंपनीचे कागदपत्रे घेऊन या. आम्ही फडणवीसांच्या काळातील कागदपत्रे घेऊन येतो. यावरून कळेल की, या कंपनीच्या नक्की कोणत्या सरकारच्या काळात मतदारसंघात आणल्या गेल्या आहेत. जर आम्ही बोलतोय, ते खरं झालं तर आमच्याऐवजी तुम्हालाच राजकारण सोडावं लागेल, असं आव्हान नवनीत राणा यांनी दिलं आहे.

Source link