Rupali Thombare on Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagawane Case ) राज्य महिला आयोगाकडून खरंच हलगर्जी झाली आहे का?, याची चौकशी करा. अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombare) यांनी सरकारकडे केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरर (Rupali Chakankar) आणि आयोगाच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. 

दरम्यान, रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासंदर्भात पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील, असेही रूपाली ठोंबरे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितली आहे. महिला आयोगाचा अध्यक्ष हा गैरराजकीय असावा, या चर्चेसंदर्भात सरकारने विचार करण्याची मागणी ही रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. त्या अकोला येथे बोलत होत्या. महिला आयोगावर निवृत्त न्यायमूर्ती किंवा निवृत्त सनदी पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या चर्चेवर सरकारने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही रूपाली ठोंबरे यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. मात्र पक्षातील नेत्यांनीच आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात भाष्य केल्याने राष्ट्रवादीतील असंतोष आणखी मिश्र होण्याची चिन्हं असल्याचे बोलले जात आहे.

रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरून पक्षातून नाराजीचा सुर

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट नाराज आहे. हगवणे प्रकरणात महिला आयोगाच्या भूमिकेवरून टीका होत असल्याने पक्षातला एक गट अस्वस्थ असल्याचे ही बोलले जात आहे. परिणामी, पक्षातील नाराज गटाने रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीची तक्रार पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर रूपाली चाकणकर यांच्याकडे कोणतंही एक पद ठेवण्याची नाराज गटाची मागणी असल्याचे ही बोलले जात आहे.

रूपाली चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासोबतच पक्षाच्या महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद देखील आहे. चाकणकर यांना दोन पैकी एका पदावरून हटवण्याची पक्षातील नाराज गटाची मागणी असल्याचे सांगण्यात येतंय. त्यामुळे आता रूपाली चाकणकर यांच्या पदाबाबत पक्ष काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link