BMC Election Exit Poll 2026 : महाराष्ट्रातील 26 महानरपालिकांसाठी मतदान झाले. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मतदारांचा कौल कुणाला मिळतो हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. मुंबई महापालिकेचे निवडणुक चर्चेत आहे ती ठाकरे बंधूच्या युतीमुळे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे (Shivsena UBT Chief Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसोबत राज ठाकरे यांची मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS Chief Raj Thackeray)  निवडणुकीच्या रिंगमात उतरली आहे. ठाकरे बंधू किती जागा जिंकणार याचीच चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. अशातच  एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. भाजप, शिवसने रिपाई यांच्या महायुतीने 100 च्या पुढे आकडा गाठल्याचे दिसत आहे. तर, ठाकरेंची शिवसेना-मनसे 80 पर्यंत पोहचल्याचे दिसत आहे. मात्र, ठाकरेंची शिवसेना-मनसेची युती 100 चा आकडा गाठू शकत नसल्याचे या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. अशातच जेव्हीसीच्या एक्झिट पोलची आकडेवारी खूपच खळबळजनक आहे. मनसेला फक्त 2 ते 5 जागा मिळू शकतात असा जेव्हीसीच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे. 

JVCच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत महायुतीला 138 जागा मिळू शकतात
ठाकरेंची शिवसेना-मनसेला 59 जागांचा अंदाज
काँग्रेस आणि वंचितला 23 जागा मिळण्याचा अंदाज
मुंबईत इतरांना 7 जागा मिळण्याचा अंदाज

जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार कोणता पक्ष किती जागा जिंकणार?
भाजप –  97–108
एकनाथ शिंदे शिवसेना –  32–38
उद्धव ठाकरे शिवसेना –  52–59
मनसे –  2–5
काँग्रेस –  21–25
इतर – 6–9

DV रिसर्चच्या पोलनुसार महायुतीला 107-122 जागा
मुंबईत ठाकरे बंधूंना 68-83 जागांचा अंदाज
काँग्रेस आणि वंचित मिळून 18-25 जागांचा अंदाज
मुंबईत इतरांना 8-15 जागा मिळण्याचा अंदाज

जनमतच्या पोलनुसार मुंबईत महायुतीला 198 जागा
मुंबईत ठाकरे बंधूंना 62 जागा मिळण्याचा अंदाज
काँग्रेस-वंचितला 20 जागा मिळण्याचा अंदाज
मुंबई इतरांना 7 जागा मिळण्याचा अंदाज

अॅक्सीसच्या पोलनुसार महायुतीला 131-151 जागा
मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना 58-68 जागांचा अंदाज
काँग्रेस आणि वंचितला 12-16 जागांचा अंदाज
अॅक्सीसच्या पोलनुसार महायुतीला 131-151 जागा





Source link

YouTube
Instagram
WhatsApp