जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पण काही लोकांच्या जीवनात हा संघर्ष अगदी जन्मतःच सुरु होता. पण त्या संघर्षाला न जुमानता  त्याच्याशी दोन हात करत एका व्यक्तीने आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून राज्यातून PSI परिक्षेत आलेले अमोल घुटुकडे. PSI अमोल घुटुकडे यांना या संघर्षाचा जणू वारसाच आपल्या आजीकडून लाभला आहे. ती आजी म्हणजे माण गावची म्हसवड येथील RJ केराबाई सरगर. 

PSI अमोल घुटुकडे यांचं कुटुंब अतिशय दु्र्गम भाग असलेल्या माण मधील म्हसवड गावातील. या कुटुंबाच उपजिवेकच साधन म्हणजे शेती आणि मेंढपाळ हा दुय्यम व्यवसाय. दुष्काळानंतर सर्वच गोष्टी कठीण झाल्या होत्या. 

शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते हे लक्षात आलं होतं. यामुळे दहावी नंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलो. पण पुण्याच वातावरण जमलं नाही आणि पहिल्याच वर्षी म्हणजे अकरावीला नापास झालो, असं अमोल सांगतात. 

इंजिनिअरिंगच शिक्षण घेतल्यानंतर नेटवर्किंग कंपनीत दीड वर्ष काम केलं. पण चार भिंतीत मन रमत नव्हतं. म्हणून २०२१ मध्ये पुन्हा गावाकडे जाऊन PSI ची तयारी केली.आणि २०२३ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त झालं, असं PSI अमोल सांगतात. 

अमोल आता नाशिकमध्ये आपलं ट्रेनिंग सुरु आहे. अमोल सांगतात की, या सगळ्या प्रवासात मला खरी प्रेरणा मिळाली ती माझी आजी केराबाई यांच्याकडून. 

RJ केराबाई या माझ्या आईच्या आई. आजपर्यंतचा तिचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. आम्ही नातवंड कधी कधी परिस्थितीसमोर हतबल होतो. पण आमची आजी आजही परिस्थितीसमोर खंबीर उभी आहे. आज तिच्या कलेने तिला वेगळी म्हणजे RJ म्हणून ओळख मिळवून देते, असं अमोल सांगतात. 

आजही मला तो दिवस आठवतोय जेव्हा माझ्याकडे PSI च्या परिक्षेसाठी शूज नव्हते. तेव्हा ही परिस्थितीसमोर हात टेकले पण आजीनेच माझ्या हातात १० हजार दिले आणि शूज घ्यायला सांगितले. आजी आजही आम्हाला प्रेरणा देतेय, असं PSI अमोल घुटुकडे सांगतात. 

आर जे केराबाई सध्या मुंबईतील नरे पार्क येथे सुरु असलेल्या माणदेशी महोत्सवात उपस्थित आहे. केराबाई यांना तुम्हाला सहज भेटता येणार आहे. हा महोत्सव रविवारी ९ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. 





Source link