ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेसेना आमदार महेंद्र दळवी यांच्यावर कॅश बॉम्ब टाकला आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.. मात्र या कॅश बॉम्बनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाचा भडका उडालाय.  सुनील तटकरेंनी महेंद्र दळवींवर केलेल्या टीकेनंतर दळवी यांनी थेट सुनील तटकरेंचेच व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकल्यानंतर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच वादाच भडका उडालाय… अंबादास दानवेंनी व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी या प्रकरणात सुनील तटकरेंना ओढत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधल्यानंतर तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार दळवींवर शालजोडीतील टोले हाणले.. आणि यानंतर संतापलेल्या आमदार महेंद्र दळवी यांनी आता सुनील तटकरेंना इशारा दिलाय… तटकरेंचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत. हे व्हिडिओ बाहेर आले तर ते तोंड दाखवू शकणार नाहीत असा इशारा दळवींनी तटकरेंना दिलाय… 

तर अशा पोकळ धमक्या देण्यापेक्षा तुम्ही जे काय असेल ते जनतेसमोर आणा असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमेल मिटकरी यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पलटवार केलाय.

अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवींचा व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर दळवी यांनी दानवे यांच्यासोबत सुनील तटकरे यांच्यावर हा व्हिडिओ पुरवल्याचा आरोप केला होता. आणि त्यानंतर तटकरेंनी दळवींवर खोचक टीका केल्यानंतर दळवींनी तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिला..

 तर अंबादास दानवेंनी महेंद्र दळवींच्या ट्विट केलेल्या व्हिडिओ वरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनाचा समाचार घेतलाय.. आता मॉर्फिंगचा धंदा सुरू झालाय… बाकी सगळे धंदे बंद झाल्याचं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केलाय..

तर दुसरीकडे  शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू झालेल्या वादावरून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर हल्लाबोल केलाय. महायुतीमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाहीय.. मित्र मित्र म्हणून एकमेकांवर धाडी टाकण्याचं आणि एकमेकांची प्रकरणं बाहेर आणण्याचं काम सुरू असल्याचं म्हणज उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय

अंबादास दानवेंनी पैशांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ ट्विट करत

आमदार महेंद्र दळवींना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच वादाचा भडका उडालाय… सुनील तटकरे यांनी महेंद्र दळवींवर टीका केल्यानंतर आता महेंद्र दळवी यांनी तटकरेंचेच व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा दिलाय.. त्यामुळे पुढल्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp