अकोला: मूर्तिजापूरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तुकाराम बिरकड यांचं काल (गुरूवारी) अपघाती निधन झालं आहे. तुकाराम बिरकड हे विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष होते. काल त्यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. तर त्याच्या अपघातानंतर आता त्यांनी लिहलेल्या पुस्तकाबाबत आणि त्यांच्या इच्छेबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी स्वत:च्या मृत्यूबद्दल काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. त्यामुळे बिडकर यांना स्वत:च्या मृत्यूची चाहूल वर्षभरापूर्वीच लागली होती का, अशी चर्चा आता होताना दिसत आहे.

काय लिहलं होतं पुस्तकात?

तुकाराम बिरकड यांनी वर्षभरापूर्वी ‘माझं गाव, माझ्या आठवणी’ नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकात त्यांनी आपल्या मृत्यूबद्दलच्या काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहलं होतं, जन्मभूमीतच मला मरण येऊ दे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. तर पुस्तकाच्या शेवटी या संत कबीरांच्या दोहे लिहले आहेत.
‘मन मरे माया मरे। मरमर गये शरिर…
आशा तृष्णा ना मरे। कह गये दास कबीर’
असा पुस्तकाचा शेवट तुकाराम बिरकडांना केला होता.

स्वत:च्या मृत्यूबद्दल बिरकड लिहतात…

बिरकडांनी त्यांच्या पुस्तकात स्वत:च्या मृत्यूबद्दल काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. ‘हे ईश्वरा मला मृत्यू जन्मभूमीत दे. माझ्या गावकऱ्यांच्या खांद्यावरुन मला शेवटच्या यात्रेला निघू दे. माझे पार्थिव गावातच आणा. जय बजरंग विद्यालयाच्या मैदानात ठेवावं. तेथे श्रमदान करुन माझे नेते शरदचंद्र पवार यांच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारले होते. त्याच ठिकाणी माझे पार्थिव ठेवा. बी. पी. एड. कॉलेजच्या मैदानावर एका कोपऱ्यात माझ्यासाठी एक जागा ठेवा. तिथेच मला माझा मुलगा पवनच्या हातून अग्नी द्या. कोणताही विधी करु नका. माझी राख इतरत्र कोठेही नेऊ नका. ती लोणार नदीत विसर्जित करा. ओंकारेश्वर हे माझं अतिशय श्रद्धेचं ठिकाण. माझ्या अस्थी नर्मदा मातेच्या उदरात विसर्जित करा. काही राख जय बजरंग विद्यालयाच्या मैदानात टाका. जेणेकरुन माझ्या शाळेचे, मंडळाचे खेळाडू त्यावर खेळतील आणि मला त्यातून आनंद मिळेल,’ अशा गोष्टी बिडकरांनी पुस्तकात लिहिल्या आहेत.

कसा घडला अपघात?

अकोला शहरातील सिटी स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या अमरावती विभागातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक होती. या बैठकीला पाच ही जिल्ह्यातील सुमारे 800 कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके देखील उपस्थित होते. माजी आमदार तुकाराम बिरकड हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी सिटी स्पोर्ट्स क्लब येथे गेले होते. भेटीनंतर दुचाकीवरून परत जात असताना जनावरे वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत तुकाराम बिरकड यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी यांचा देखील जागीच मृत्यू झाला आहे.

Source link