Eknath Shinde on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या (Laadki Bahin) योगदान व शुभेच्छावर जिंकणार आहे असं म्हटलं आहे. तसंच  सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले असल्याची टीका केली. कोल्हापूरमधील शिरोळ येथील प्रचारसभेत ते बोलत होते.  लाडक्या। बहिणीना पैसे दिले, यात आम्ही काय पाप केलं? अशी विचारणाही त्यांनी केली. 

“ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या योगदान व शुभेच्छांवर जिंकणार आहे. लाडकी बहीण सुपरहिट झाली आहे. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांचा खात्यात डिसेंबरमध्ये जमा होतील. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. लाडक्या बहिणीना पैसे दिले, यात आम्ही काय पाप केलं?,” अशी विचारणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ताही येणार; मुख्यमंत्र्यांनी स्वत: जाहीर केली तारीख, म्हणाले…

 

राजेंद्र पाटील यांच्या शेट्टीने समोरच्या विरोधकांची शिट्टी गुल झाली आहे असा टोला यावेळी त्यांनी राजू शेट्टींना लगावला. “काँग्रेस म्हणत आहे की आमचं सरकार सत्तेत आलं की आम्हाला जेलमध्ये टाकणार आहेत. पण लाडक्या बहिणींसाठी 100 वेळा मी जेलमध्ये जायला तयार आहे”.

लाडक्या बहीण योजनेत खोडा घालत आहेत, त्यांना कोल्हापूरी जोडा दाखवा. लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. ती महिला सक्षमीकरणासाठी आहे, महिला सुखी तर देश सुखी, लाडक्या बहिणी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असंही एकनाथ शिंदे म्हणाले. हे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. हे सरकार देना बँक आहे, लेना बँक नाही असा टोला यावेळी त्यांनी लगावला.  शेतकरी आपला माय बाप आहे. तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे असंही त्यांनी सांगितलं. 

डिसेंबरचा हफ्ता कधी जमा होणार?

कुर्ल्यातील आपल्या पहिल्या सभेत एकनाथ शिंदे यांनी 20 नोव्हेंबरला निवडणूक संपताच डिसेंबरचे पैसे जमा होणार अशी घोषणाही केली होती. “आम्ही लोकांमधे जाऊन काम करणारे लोक आहोत. घरी बसून फेसबुक लाईव्ह नव्हे तर फेस टु फेस काम करणारे आहोत. आम्ही लाडक्या बहिणींना 1500 देऊन थांबणार नाही. हे पैसे आम्ही वाढवणार आहोत. आता आचारसंहिता  लागली आहे. विरोधकांना वाटलं की नोव्हेंबरचे पैसे मिळणार नाहीत, त्याच्या आधारे सरकारविरोधात बोंब मारण्यची संधी मिळेल. पण आम्हाला विरोधी चालाख आहेत याची माहिती होती. आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. यामुळे त्यांची बोलती बंद झाली,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. 





Source link