Vidharbha agriculture News : पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील अनेक तालुक्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.. जुलै महिन्यात याच पाच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली पण तरीही काही तालुके अशे आहेत त्याठिकाणी अजूनही पावसाने दमदार हजेरी लावली नाहीये..

बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यापैकी 05 तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्हा मुख्यालयाला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात फक्त 15 टक्केच पाणी साठा असून पुढील फक्त एक महिना पाणी पुरवठा होऊ शकेल इतकाच पाणीसाठा या धरणात शिल्लक आहे. धरण परिसरात पाऊस न बरसल्यास आगामी काळात दीड ते दोन लाख लोकसंख्या असलेल्या बुलढाणा शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्याप्रमाणे अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

अमरावती जिल्ह्यातही दर्यापूर (56 टक्के ), धारणी (58 टक्के ) आणि अनजंगाव सुर्जी (68 टक्के ) या तीन तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये सरासरी इतका पाऊस झालेला असला तरीही काही ठिकाणी मात्र दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील दमदार पावसाची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत.

अकोला जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती काहीशी समाधानकारक अशी आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपर्यंत सरासरी 98.80 टक्के इतका पाऊस झाला असून जल प्रकल्पामध्येही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ( 64.40 टक्के) वान (63.68 टक्के) आणि मोर्णा (68.41 टक्के) हे तीन प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांमध्ये जवळपास 100 टक्के इतका पाणीसाठा सद्यस्थितीत उपलब्ध आहे.

वाशीम जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात यंदाही सरासरी इतका पाऊस पडल्याचे चित्र आहे. वाशीम जिल्ह्यातील मागील दोन महिन्यातील पावसाची परिस्थिती पाहता वाशीम 70.09 टक्के, रिसोड 85.01 टक्के, मालेगाव 104.07 टक्के, मंगरूळपीर 129.01 टक्के, मानोरा 105.09 टक्के आणि कारंजा लाड 109.05 टक्के इतका पाऊस झाल्याची नोंद आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांपैकी पुसद तालुक्यात 53 टक्के इतका तर उर्वरित 15 तालुक्यामध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील पावसाची एकूण सरासरी पाहता 64.42 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील पुसद (44.28 टक्के), राळेगांव (52.52 टक्के ) आणि वणी (52.53 टक्के ) हे तीन तालुके वगळता इतर तालुक्यामध्ये पावासाची परिस्थिती चांगली असल्याचे चित्र आहे…

अमरावती विभागातील कमी पर्जन्यमान झालेले तालुके आणी जलसाठा

बुलढाणा जिल्हा 

बुलढाणा – 25.84 टक्के
खामगाव – 37.87 टक्के
चिखली – 32.95 टक्के
लोणार – 41.00 टक्के
सिंदखेड राजा – 38.57 टक्के

कमी जलसाठा असलेले प्रकल्प

नळगंगा – 26.36 टक्के
पेण टाकळी – 46.11 टक्के
खडकपूर्णा – 05.42 टक्के
पलढग – 14.11 टक्के
तोरणा – 26.24 टक्के

अमरावती जिल्हा 

दर्यापूर – 56 टक्के
धारणी – 58 टक्के
अंजनगाव सुर्जी – 68 टक्के

कमी जलसाठा असलेले प्रकल्प

बोर्डी नाला – 18.65 टक्के
पंढरी – 30.95 टक्के
शहानूर- 57.06 टक्के 

अकोला जिल्हा

अकोट – 73.05 टक्के 
मूर्तिजापूर – 85.01 टक्के 
पातूर – 86.07 टक्के

कमी जलसाठा असलेले प्रकल्प

काटेपूर्णा – 64.40 टक्के
वान – 63.68 टक्के
मोरणा – 68.41 टक्के

यवतमाळ जिल्हा

पुसद – 44.28 टक्के
वणी – 52.53 टक्के
राळेगाव – 52.52 टक्के
बाभुळगाव – 57.90 टक्के
उमरखेड – 59.18 टक्के
मारेगाव – 58.54 टक्के

कमी जलसाठा असलेले प्रकल्प

बेंबळा – 33.73 टक्के
अडाण – 68.89 टक्के

 



Source link