नागपूर : विदर्भात (Vidarbha) आज सकाळपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूरला (Chandrapur) आज रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आलेला आहे. तर नागपूर (Nagpur), गडचिरोली (Gadchiroli), वर्धा (Wardha), अमरावती (Amaravati) या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.
नागपूरमध्ये गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. नागपूरमधील अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. तसेच ज्या परिसरात नवीन काँक्रिटीकरणाचे काम झाले आहे त्या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच नाग नदीच्या संरक्षक भिंतीला अनेक ठिकाणी खचली होती. या भिंतीच्या डागडुजीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु होते. मात्र आता या ठिकाणाहून पाणी यायला लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
नागपूरमधील शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर
नागपूरच्या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी घेतला आहे. तर वाढत्या पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
गडचिरोलीत पावसाचा कहर
गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याने 48 तास अतिवृष्टीचा इशारा दिला होता. आज जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सगळीकडे पडत आहे. सध्या मुख्य मार्ग सुरळीत सुरू आहे. काल जिल्ह्यात एकूण सरासरी 52.0 मिमी पावसाची झाले आहे. काल जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस 40 पैकी 13 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा मंडळामध्ये सर्वाधिक 270.8 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापैकी सिरोंचा मुख्यालयी 184 मिमी पाऊस कोसळला आहे.
भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस
भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह जिल्ह्यात कुठं हलक्या, कुठं मध्यम तर कुठं जोरदार सरी बसल्यात. पहाटेच्या सुमारास या पावसानं चांगलाच जोर पकडला. या पावसानं जिल्ह्यातील नदी – नाले प्रवाहित झाले आहेत. तर, काही सखल भागात पावसाचं पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..