अकोला : अकोला जिल्ह्यातील (Akola News) मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रविण जंजाळ यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेयेत. मोरगाव भाकरे गावालगतच्या मैदानावर त्यांना लष्करी इतमामात अंतिम निरोप देण्यात आलाय. अकोल्यातील शहीद प्रविण जंजाळ यांना आज अंतिम निरोप देण्यात आलाय. दुपारी 3 वाजता नागपूरमार्गे त्यांचं पार्थिव त्यांचं गाव असलेल्या मोरगाव भाकरेमध्ये दाखल झालं होतंय. यावेळी गावातून पुष्पवृष्टी करीत त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. हवेत बंदुकीच्या फैरी झाडत त्यांना मानवंदना देण्यात आलीय. यावेळी जिल्ह्यातील हजारो नागरिकांसह अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांसह इतर अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात 6 जून रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्रविण जंजाळ शहीद झाले होतेय. या चकमकीत प्रविणसह दोन जवान शहीद झाले. दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी प्रशासनावे काहीच व्यवस्था केली नसल्याचा आरोप शरीराच्या भावाने केलाय. तर खासदार बळवंत वानखडे यांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर टीका केलीय. मुलगा शहीद झाल्याचा सार्थ अभिमान असल्याची कुटुंबियांची भावना हिच या देशाच्या महानतेची साक्ष देणारी आहे.
गावावर शोककळा
अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हे राहायला होते. 2019 मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या लग्नाला नुकतंच झालं. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे . प्रवीण जंजाळ चार महिन्यांपूर्वीच गावी सुटीवर आले होते. या सुटीत त्यांचा विवाह झाला होता. प्रवीण यांची ही कुटुंबासोबतची शेवटची भेट ठरली. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर बारावीपर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले होते. त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींनी रात्र जागून काढली.
प्रवीण यांचे दोन काकाही होते सैन्यदलात
प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते. त्याच्या पूर्वी त्यांचे मोठे बाबा भास्करराव बाजीराव जंजाळ आणि त्यांचे काका रविंद्र जंजाळ हे सैन्यदलात होते. भास्करराव यांचे चार वर्षांपूर्वी हृदविकाराने निधन झाले आहे.
हे ही वाचा :
4 महिन्यांपूर्वी स्वत:च्या लग्नासाठी गावाकडं आला तो शेवटचाच; शहीद प्रवीणच्या मित्राने आठवणींनी जागवली रात्र
अधिक पाहा..