Shivsena GharaneShahi: लोकसभा निवडणुका असो की विधानसभा निवडणुका,बहुतांश नेत्यांना आपल्या कुटुंबातल्याच व्यक्तींना उमेदवारी मिळावी ही अपेक्षा असते. ती नाही मिळाली की सुरु होते नेत्यांची नाराजी.त्यामुळे पक्ष सुद्धा सढळ हस्ते नेत्यांच्या घरात उमेदवाऱ्या देतो.पण आता नेते जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना डावलून आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांना उमेदवारीसाठी पुढे करतायत. शिंदेंच्या शिवेसनेमध्ये तर याची अनेक उदाहरणं आहेत.त्यामुळे कार्यकर्त्यांनी फक्त हातात झेंडे आणि गळ्यात पक्षाचे गमछे घालून फिरायचं का हा प्रश्न उपस्थित होतोय. 

Add Zee News as a Preferred Source

विधानसभा लोकसभा लोकसभा निवडणुकांमध्ये नेत्यांसाठी कार्यकर्ते राबराब राबतात.नेत्यासाठी, पक्षासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतात.पालिका, जिल्हा परिषद , पंयायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. कारण इथे तरी सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुक प्रक्रियेचा भाग होता येतं, प्रतिनिधीत्व घेता येतं आणि जनतेचा कौल मिळाला तर सत्तेतही सहभागी होता येतं. पण राजकारण्यांची नेत्यांची भूक आता इतकी वाढलीये की इथे सुद्धा ते कार्यकर्त्यांना डावलून आपल्याच घरातल्या सदस्यांना पुढे करतायत. कुणी भावा बहिणीला पुढे करतं, कुणी मुला मुलींना, कुणी आई किंवा बायकोला. पण उमेदवारी आपल्याच घरात कशी राहिल याचा पुरेपुर प्रयत्न केला जातो. पालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतही हेच चित्र दिसतंय.. घराणेशाही सर्वच पक्षांमध्ये आहे पण शिंदेंच्या शिवसेनेतच याचा विशेष बोलबाला आहे.

शिवसेनेतली ‘घराणेशाही’

अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सिल्लोडचे नगराध्यक्ष आहेत.दुसरा मुलगा आमेर यांना जिल्हा परिषद उमेदवारी

खासदार संदिपान भुमरेंचे चिरंजीव विलास भामरे आमदार,पुतण्या शिवराज भुमरेंना जिल्हा परिषदेत उमेदवारी

धाराशिवच्या रविंद्र गायकवाडांचे चिरंजीव किरण सध्या उमरग्याचे नगराध्यक्ष तर पत्नी उषा यांना जिल्हा परिषदेमध्ये उमेदवारी देण्यात आली

माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या मुलीला पंचायत समितीची उमेदवारी

तानाजी सावंतांचा पुतण्या धनंजय सावंत यांना जिल्हा परिषदेत उमेदवारी

संजय शिरसाटांचा मुलगा आणि मुलगी दोघांनाही महापालिकेत उमेदवारी

अर्जुन खोतकरांच्या मुलीलाही जालना महापालिकेत उमेदवारी

आमदार बालाजी कल्याणकरांचे चिरंजीव सुहास यांना नांदेड महापालिकेची उमेदवारी

नांदेड जिल्हा प्रमुख उमेश मुंडेंच्या मुलाला महापालिकेत उमेदवारी

आमदार संतोष बांगर यांच्या भावजय हिंगोलीच्या नगराध्यक्ष

 
आता ऐरवी सामान्य शिवसैनिकांचा पक्ष असलेल्या शिवसेनेतच फोफावलेल्या या घराणेशाहीबद्दल मात्र मंत्री शिरसाटांना काहीच वाटत नाही. इतरही पक्षात हेच चित्र असल्याचं ते सांगतात. तर शिवसेना युबीटीच्या नेत्यांनी मात्र यावर टीका केलीये. 

हे झालं शिवसेनेतलं. पण सर्वपक्षांचा आपल्या घराणेशाहीसाठी कसा वापर केला जातो त्याचंही एक उदाहरण आहे. भाजप नेते सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी भाजपकडून परभणीत नगरसेवक आहेत.मुलगा समशेर वरपुडकर, सून  प्रेरणा  आणि पुतण्या बोनी हे भाजपकडून जिल्हा परिषदेत उमेदवार आहे तर मुलगी सोनाली शिवसेना युबीटीकडून उमेदवार आहेत तर पुतण्या अनिल वरपुडकर काँग्रेसकडून उमेदवार आहे.म्हणजे पक्ष, कार्यकर्ते राहिले बाजुला पण सगळी पदं आपल्याच कुटुंबात कशी राहतील याची तजवीज महत्वाची.. त्यामुळेच एकाच घरात 6-6 पदं आहेत.

सर्वसामान्यांनाही निवडणूक प्रक्रियेत भाग घेता यावा अश्या पद्धतीने आपल्या लोकशाहीची रचना आहे. पण कार्यकर्त्याचा एकदा का प्रस्थापित नेते झाला की ते आपल्या कुटुंबातल्याच सदस्यांना राजकीय उत्तराधिकारी म्हणून पुढे करतात. पण सामान्य कार्यकर्ता मात्र आयुष्यभर हातात झेंडा घेऊन फक्त प्रचारापुरताच यांना लागतो.आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नेते कुटुंबियांनाच पुढे करत असतील तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या का?





Source link

YouTube
Instagram
WhatsApp