Akola Crime News : अकोल्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजप मधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. यात भाजपच्या (BJP) महिला सरपंचानी शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे.
अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय. अकोला जिल्ह्यातील हिंगणी बुजरूक गावाच्या भाजपच्या सरपंच डॉ. कल्पना पळसपगार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. पळसपगारांनी तक्रारीत दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा केला आरोप. परिणामी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दातकर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या महिला सरपंचाचा गंभीर आरोप
अकोल्यातील हिंगणी बुजरूक हे गोपाल दातकरांचं गाव आहे. तर अकोला पूर्व विधानसभेसाठी ते ठाकरे गटाकडून दावेदार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपने जाणीवपुर्वक या गुन्ह्यात आपल्याला अडकवल्याचा दातकर यांचा आरोप आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच राजकीय वर्तुळासह जिल्ह्यात एकच चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. गुन्हा का दाखल केला?, याचा जाब विचारण्यासाठी आमदार नितीन देशमुख थोड्याच वेळात पोलीस अधिक्षक कार्यालयात भेट देणार आहे. त्यामुळे या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अकोला (Akola) जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुटुंबियांच्या मनाविरुद्ध लग्न केलेल्या तरुणीच्या ऑनर किलींगचा (Honour killing) प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसांवर तरुणीच्या कुटुंबियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना पातूर (Patur) तालुक्यातल्या पेडका पिंपरडोळी गावालगत घडली आहे. उमेश सांगळे असं हल्ला झालेल्या पोलिसाचं नाव आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे.
तिघांवर गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबियांनी उमेश सांगळे या पोलीस शिपायावर हल्ला केला आहे. या हल्ल्याचा ‘एक्सक्लूझिव्ह’ व्हिडीओ ‘एबीपी माझा’च्या हाती लागलाय. काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. पोलीस उमेश सांगळेंच्या सतर्कतेमुळं या घटनेतील प्रेमविवाह केलेली तरुणी बचावली आहे. दरम्यान, या घटनेत मुलीची आई आणि दोन भाऊ अशा तिघांवर अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलिसांत जीवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामांत अडथळा निर्माण करण्याचा गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना चान्नी पोलिसांनी अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..