Amol Mitkari On Sadabhau Khot : भाजपाचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) पातळी सोडून वैयक्तिक टीका केलीय. शरद पवारांना महाराष्ट्र स्वतःच्या तोंडासारखा करायचा आहे का?, असा सवाल केलाय. सदाभाऊ खोत यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सदाभाऊ खोत यांनी आपली क्षमता ओळखून शरद पवारांवर टीका करावी असं मिटकरी म्हणालेय. शरद पवारांवरील पातळी सोडून केलेली टीका आमचा पक्ष सहन करणार नसल्याचा इशारा ही त्यांनी सदाभाऊ खोत यांना दिलाय.
निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, दिग्गज नेत्यांवर टीका टीपण्णी करण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक बडे नेते टीका करताना दिसून येतात. त्यात, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजपसोबत असलेल्या रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्याकडून सातत्याने टीका होत असते. आता, भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतून सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. जत विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर बोचरी व शारिरीक व्यंगावरुन टीका केली. आता, त्यांनी केलेल्या या टीकेवरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार पलटवार केला आहे.
सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले
शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणाला, पण येवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे…मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा…महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. तसेच गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे काम कोणी केले असेल, ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी…असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
शरद पवारांबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही- जितेंद्र आव्हाड
सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्यामुळे त्यांचा जबडा काढण्यात आलेला आहे. ज्यावेळी त्यांचं ऑपरेशन झालं त्याच्या काही दिवसानंतर लगेच शरद पवार रक्त येत असताना देखील सभांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आपण काय बोलतो याची काही समज नाही का आपल्याला. महाराष्ट्र घडवण्यात तुमचा एक टक्का वाटा नाही, शरद पवारांचा शंभर टक्के वाटा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची अक्कल शून्यता लक्षात येते. तुमची अक्कल धुळीला मिळालेली आहे. सदाभाऊ खोत तुमच्या वडिलांची तुम्ही अशी टिंगल केली असती का? तुमच्या चेहऱ्यावर डाग पडला तर घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा
अधिक पाहा..