मुंबई, 29 जुलै : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गीतकार जावेद अख्तर यांची बायको शबाना आझमी आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहतात. घटना सामाजिक असो वा बॉलिवूडशी निगडित असो, प्रत्येक गोष्टीवर आपलं परखड मत मांडायला त्या मागेपुढे पाहत नाहीत. सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील भूमिकेमुळे शबाना आझमी चर्चेत आहेत. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या शबाना आझमींना आज बॉलिवूडमध्ये चांगलाच मान सन्मान आहे. पण एकेकाळी एका चित्रपटात ज्युनियर आर्टिस्टसमोर त्यांचा अपमान झाला तेव्हा शबाना आझमींनी करिअर बाबत मोठा निर्णय घेतला होता.

शबाना आझमीनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी  ‘एकेकाळी अभिनयक्षेत्र  सोडण्याचा विचार केला होता’ असा खुलासा केला आहे. 1977 मध्ये आलेल्या ‘परवरिश’ चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या एका घटनेने शबाना आझमी एवढ्या दुःखी झाल्या की त्या कुठलाही पुढचा मागचा विचार न करता त्या रडत अनवाणी पायानेच आपल्या जुहूच्या घरी निघून गेल्या होत्या. आता  46 वर्षांनंतर त्यांनी या घटनेचा खुलासा केला आहे.

शबाना यांनी नुकतंच एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की, त्यांना अभिनय चांगला येत असला तरी डान्स अजिबातच करता येत नव्हता. पर्वरीश या चित्रपटादरम्यान अभिनेत्रीला एक डान्स सीक्वेन्स शूट करायचा होता. तो शूट करताना त्या खूपच नर्व्हस होत्या कारण त्यांना नीतू सिंगसोबत डान्स करायचा होता  जी डान्समध्ये खूप चांगली होती. खूपच दडपण येऊन अभिनेत्रीने प्रसिद्ध कोरिओग्राफर कमल मास्टरला शूटिंगपूर्वी तिची रिहर्सल घ्यायला सांगितली होती, मात्र कमल मास्टरने तिला  ‘रिहर्सलची काही  गरज नाही, कारण तुला फक्त टाळ्या वाजवायच्या आहेत.’ असं सांगितलं. पण त्यांनी कमलला डान्स स्टेप्स खूप अवघड असल्याचं सांगितलं आणि त्यात काही बदल करता येतील का असं विचारलं. त्यावेळी सेटवर अनेक ज्युनियर कलाकार उपस्थित होते.

Tejashree Pradhan : ‘किती वर्ष तुम्ही तेच दाखवणार…’ तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहताच भडकले प्रेक्षक

कोरिओग्राफर शबानाला म्हणाला, ‘आता शबाना जी, कमल डान्स मास्टरला कुठल्या स्टेप्स करायच्या ते सांगणार.’ असं म्हणत त्यांनी सगळ्यांसमोर अभिनेत्रीचा अपमान केला. शबानाला तेव्हा एवढं वाईट वाटलं कि त्या आहे त्या कपड्यांमध्ये सेटच्या बाहेर आल्या. त्यांची गाडी तिथे हजर नव्हती. पण त्यांना त्या सेटवर क्षणभरही थांबण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्या मुंबईतील जुहू येथील आपल्या घराकडे तडक अनवाणी पायानेच चालत गेल्या. तेव्हा तो अपमान सहन न झाल्याने त्यांनी परत कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला होता.

पण त्यानंतर ‘परवरिश’चे दिग्दर्शक मनमोहन देसाई आल्यावर त्यांनी शबाना आझमी यांना मिठी मारली आणि झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. दुसऱ्या दिवशी नीतू सिंगने शबाना यांना घटनेबद्दल विचारले. त्यानंतर सुलक्षणा पंडित यांनी शबानाला, तू मुख्य अभिनेत्री असल्याने या चित्रपटासाठी कोरिओग्राफरपेक्षा जास्त महत्त्वाची आहेस.असं सांगून सेटवर पुन्हा परत आणलं.

करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात 72 वर्षीय शबाना आझमी  झळकल्या आहेत. यात त्यांचा  87 वर्षीय धर्मेंद्रसोबतचा किस सीन चर्चेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link