Bank Holiday on May 1: 1 मेच्या दिवशी तुम्ही बँकेचे कोणते काम करण्यासाठी जात असाल तर आत्ताच ही बातमी वाचा. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी बँक बंद राहणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला जातो. या दिवशी राज्यभरातील बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकानुसार 1 मे रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
RBIच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, मेमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद असणार आहेत. यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि 4 रविवार यांचाही समावेश आहे. RBIच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सुट्टीच्या यादीत वेगवेगळ्या राज्यांनुसार सुट्ट्या जाहीर करण्यात येतात.
महाराष्ट्राव्यतिरिक्त या राज्यातही बँका बंद
1 मे रोजी कामगार दिन असल्यामुळं महाराष्ट्राव्यतिरिक्त इतरही राज्यात बँका बंद असणार आहेत. बेलापूर, बंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, कोची, कोलकाता, पणजी, पटना आणि थिरुअनंतापुरम या राज्यातही बँका बंद असतील.
1 मेला शेअर बाजारही बंद
1 मे रोजी BSE आणि NSE देखील बंद असणार आहेत. या दिवशी शेअर बाजाराचे कोणतेही काम होणार नाही. शेअर बाजार बंद असणार आहे.
30 मे रोजीही बँका बंद
30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बेंगळुरूत बँका बंद असणार होत्या. अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळं या दिवशी सराफा दुकानात मोठी गर्दी होते.