HAL Recruitment 2024: शिक्षण कमी असेल तर आपल्याला नोकरी कुठे मिळणार नाही असा अनेकांचा समज असतो. त्यातली नोकरी मिळालीच तर जास्त पगार मिळणार नाही, असेही अनेकांना वाटते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण दहावी उत्तीर्ण, डिप्लोमा धारकांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची संधी चालून आली आहे.  त्यामुळे आता कमी शिक्षण असेल तरी काळजी करत बसू नका. हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे विविध विभागांमधील 58 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. 

रिक्त पदांचा तपशील

ऑपरेटर सिव्हिलची 2 पदे भरली जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावे. तसेच सिव्हिल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन/ मॅकेनिकल कोर्स केले असावा. ऑपरेटर इलेक्ट्रीकलची 14 पदे भरली जाणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सिव्हिल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन/ मॅकेनिकल पूर्ण केलेले असावे. ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्सची 6 पदे भरली जातील. यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण, सिव्हिल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन/ मॅकेनिकल डिप्लोमामध्ये किमान 60 टक्के गुण मिळवलेले असावेत. 

ऑपरेटर मॅकेनिकलची 6 पदे भरली जाणार असून उमेदवाराने किमान दहावी उत्तीर्ण असावे. तसेच सिव्हिल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन/ मॅकेनिकल डिप्लोमामध्ये 60 टक्के गुण मिळवलेले असावेत. ऑपरेटर फीटरची 26 रिक्त पदे भरली जाणार असून उमेदवाराने फिटर/इलेक्ट्रॉनिक्स/ मॅकेनिकमध्य डिप्लोमा केलेला असावे. ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक्सची 4 पदे भरली जाणार असून उमेदवार दहावी उत्तीर्ण सोबतच फिटर किंवा इलेक्ट्रॉनिक मॅकेनिकमध्ये 60 टक्के गुणांसह आयटीआय उत्तीर्ण असावा. 

वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क

या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षांदरम्यान असावे. एसएसी/एसटी उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात आली असून ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही, याची नोंद घ्या. 

अर्जाची शेवटची तारीख

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या रिक्त पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पद आणि अनुभवानुसार 22 हजार ते 23 हजार रुपयांपर्यंत पगरा दिला जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक येथे काम करण्याची तयारी हवी. 30 जून याची अर्ज करण्याची शेवटची तारीख असून 14 जुलै रोजी अर्ज आलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी आढळल्यास, दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा





Source link