Panvel-Karjat Corridor: मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) उपनगरीय रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यात येत आहे. या अंतर्गत पनवेल-कर्जत लोकल कॉरिडॉर असा नवा रेल्वे मार्ग विकसीत केला जात आहे.  पनवेल-कर्जत लोकल कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. पनवेल-कर्जत लोकल कॉरिडॉरचे  70 टक्के काम पूर्ण झाले आहे.  पहिला एंड अनलोडिंग रेक (ईयूआर रेक) महापे स्थानकात दाखल झाला आहे. 

मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (MRVC) च्या माध्यमातून पनवेल-कर्जत लोकल कॉरिडॉर उभारला जात आहे. पनवेल-कर्जत हा नवीन रेल्वे मार्ग सुरू झाल्यावर प्रवाशांना एक उत्तम पर्याय मिळणार आहे. नवीन कॉरिडोरमुळं पनवेल आणि कर्जतच्या मध्ये फास्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे पवनवेलहून कर्जतल जायचे असल्यास टट्रेन बदलण्याची गरज नाही. या प्रकल्पासाठीचा पहिला एंड अनलोडिंग रेक (EUR)  साईटवर पोहचला आहे.    लवकरच कर्जत आणि चौक स्थानकांदरम्यान ट्रॅक टाकण्याचे काम सुरू होणार आहे.

या प्रकल्पात वापरण्यात येणारे रेल्वे पॅनेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) ने तयार केले आहेत. प्रत्येक रेल्वे पॅनेलची लांबी 260 मीटर इतकी आहे. याचे वजन प्रति मीटर 60 किलो आहे. पहिल्या टप्प्यात, हे जड पॅनेल महोपे आणि चिखले स्थानकांदरम्यानच्या 7.8 किमी लांबीच्या विभागात बसवले जाणार आहेत.

या प्रकल्पात 3,100 मीटर लांबीचे तीन बोगदे बांधले जात आहेत.  त्यापैकी वेव्हरली बोगदा हा सर्वात लांब बोगदा आहे. याची लांबी 2625  मीटर इतकी आहे. याचे काम आधीच पूर्ण झाले आहे. 300 मीटर लांबीचा किरवली बोगद्या आणि 219 मीटर लांबीच्या नाधल बोगद्याचे कामही वेगाने सुरू आहे. या कॉरिडॉरची सर्वात खास गोष्ट म्हणजे बोगद्यांच्या आत बॅलास्ट-लेस ट्रॅक टाकले जात आहेत. यामध्ये न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरण्यात आली आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्मार्ट लाइटिंग सिस्टम, व्हेंटिलेशन, सार्वजनिक आश्रय क्षेत्र आणि बोगदा नियंत्रण प्रणाली यासारख्या सुविधा तयार केल्या जात आहेत. 

पनवेल-कर्जत 29.6 किमी लांबीचा लोकल कॉरिडॉर आहे. या म्रगावर पाच स्थानके बांधली जाणार आहेत.  पनवेल, चिखले, महोपे, चौक आणि कर्जत अशी ही स्थानके आहेत. या रेल्वे मार्गासाठी 47 पूल बांधले जात आहेत. त्यापैकी 29 लहान आणि 6 मोठे पूल पूर्ण झाले आहेत. महोपे आणि किरवली दरम्यान 4 रोड ओव्हर ब्रिज (ROB) देखील बांधण्यात आले आहेत. डिसेंबर 2025 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हे काम नियोजीत वेळेस पूर्ण झाल्यास 2026 मध्ये या मार्गावर लोकल धावेल. 2,782 कोटींचा  हा प्रकल्प आहे.  

 





Source link