Akola News अकोला : राज्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी  (Farmers) वर्गात शेतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. मात्र गेल्या उन्हाळ्यात अचानक आलेल्या अवकळी पावसाने सर्वत्र एकच दाणादाण करत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलं आहे. परिणामी, पीकविमा कंपनी (Crop Insurance) कडून या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून शेतकरी मोठ्या अपेक्षेने पीक विमा (Pik Vima) कंपनी आणि कृषि अधिकाऱ्यांकडे धाव घेत आहेत. मात्र अद्याप शेतकऱ्यांना कुठलीही मदत न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज अकोटमध्ये तालूका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकर्यांनी स्वत:सह कार्यालयात डांबले. या प्रकारामुळे परिसरात काहीकाळ चांगलेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.   

विम्याचे जवळपास 4.75 कोटी रुपये थकीत 

अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यात जवळपास पावणेदोनशे शेतकरी केळीच्या पीकविम्यापासून वंचित आहेत. वेळोवेळी याबाबत तक्रार करूनही संबंधित प्रशासनाने अद्याप कुठलीही उपाययोजना अथवा ठोस आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज थेट कृषि अधिकारी, विमा कंपनी अधिकार्‍यांसह स्वत:ला डांबून घेतलं. यावेळी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे आंदोलनात सहभागी झाले होते. विम्याचे जवळपास 4.75 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेतल्याशिवाय कृषी अधिकारी आणि विमा प्रतिनिधींना कार्यालयातच डांबून ठेवणार असल्याचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे परिसरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून शेतकऱ्यांनी मात्र कार्यालयाचा दरवाजा उघडण्यास आंदोलक शेतकरी आणि शेतकरी संघटनेने नकार दिला आहे. 

तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

अमरावती जिल्ह्यातील वरुड – मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना 2023 मधील अतिवृष्टी, अवकाळी पावसाचे रखडलेले अनुदान तात्काळ देणात यावे, या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यावर कोणतीही कार्यवाही नसल्याने आज शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी त्यांनी वरुडच्या तहसीलदारांच्या दालनात वरुड पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ असून शेतकऱ्यांना खत, बी बियाणे घ्यावे लागत असतात. त्यामुळे जवळ पैसे नसल्याने आणि अवकाळी ने शेतकऱ्यांचे मोठे नुकशान केल्याने शेतकरी आधीच आर्थीक अडचणीत सापडला आह. त्यामुळे त्यांना या अनुदानाचे रक्कमेची आवश्यकता आहे. परिणामी, आता शेतकरी या मागणीला घेऊन शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link