Vishalgad Illegal Construction Matter: कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्याला हिंसक वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.  विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. असं असतानाच आता विशाळगडावर स्थानिक नागरिकांना मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. तर काही अज्ञातांनी विशाळगडावजळील घरांवर दगडफेक केली आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाळगड परिसरात जमावबंदीचा आदेश आधीच लागू करण्यात आला आहे. विशाळगड परिसरात पोलिसांचा मोठा फौजपाठा तैनात असून या परिसरामध्ये तणाव दिसत आहे.

संभाजीराजे विशाळगडच्या दिशेने

विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आज संभाजी राजे छत्रपती यांनी चलो विशाळगड अशी हात दिली असल्याने कोल्हापूरमध्ये सकाळपासूनच जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातच आता गडावरुन ही बातमी समोर येत असल्याने कोल्हापूरमधील वातावरण चांगलेच तापले आहे. विशाळगडाच्या वाटेवर असलेल्या संभाजी राजे छत्रपतींनी ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं तो आज संकटात आहे, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना नोंदवली. विशाळगडाला जाण्यासाठी निघण्यापूर्वी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलातना  “माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर त्याचा मला आनंद आहे,” असं वक्तव्य संभाजी राजे छत्रपती यांनी केलं होतं. 

सरकारवर टीका

“राज्य सरकार हे स्थानिक आमदाराच्या दबावाखाली विशाळगडला अतिक्रमण मुक्त होवू देत नाहीये,” असा आरोप देखील संभाजी राजे यांनी केला आहे. “विशाळगडावर एकूण 156 जणांनी अतिक्रमण केले आहे, त्यातील फक्त 6 जणांना न्यायालयाने अतिक्रमण काढायला स्थगिती दिली आहे, मग राज्य सरकार उर्वरित अतिक्रमण का काढत नाही,” असा सवाल देखील संभाजी राजे यांनी उपस्थितीत केला आहे.

कोल्हापूर अलर्टवर

संभाजी राजे छत्रपती यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. प्रशासनाने जिल्ह्यात जमाव बंदी आदेश जारी केले आहेत. त्याचबरोरीने विशाळगड मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजी राजे यांनी संपर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांना चलो विशाळगडचा नारा दिला आहे. त्यामुळे विशाळगडाच्या दिशेने हजारो शिवभक्त येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रकरण पुन्हा चर्चेत

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनं केले जात आहे.  विशाळगड अतिक्रमणावरून कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनीदेखील हा मुद्दा उपस्थित केला आहे. बकरी ईदला उच्च न्यायालयाने विशाळगडावर कुर्बानीला परवानगी दिल्यानंतर विशाळगडावरील अतिक्रम पुन्हा चर्चेत आलं आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp